27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरमनोरंजनसलमान, शाहरुखला सोबत घेऊन हृतिकचा 'वॉर 2' येतोय...

सलमान, शाहरुखला सोबत घेऊन हृतिकचा ‘वॉर 2’ येतोय…

हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ बद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ या मूळ चित्रपटाने धम्माल उडवून दिली होती. यशराज फिल्म्स ‘स्पाय युनिव्हार्स’ या संकल्पनेतून ‘वॉर’ चित्रपटाची निर्मिती झाली होती. ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा हे’, ‘वॉर’, ‘पठाण’ या चित्रपटातून ‘स्पाय युनिव्हार्स’चा चेहरा बनलेल्या सलमान खान, शाहरुख खान आणि हृतिक रोशन हे तीन इंडस्ट्रीतील मातब्बर कलाकार पहिल्यांदाच ‘वॉर२’ च्या निमित्ताने स्क्रीन शेअर करणार आहेत. याआधी तिघांनी ९०च्या दशकातील ‘करण अर्जुन’ या प्रसिद्ध सिनेमात एकत्र काम केले होते. त्यावेळी हृतिक रोशन सिनेमाचा सहदिग्दर्शक होता.

‘वॉर 2’ चित्रपटात हृतिक मुख्य भूमिकेत आहे. अयान मुखर्जी ‘वॉर 2’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या महिन्यातच ‘वॉर 2’चे शूटिंग सुरु होईल. प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी देखील ‘वॉर२’मध्ये झळकतील. ‘वॉर 2’मधून ज्युनियर एनटीआर हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करेल. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर नकारात्मक भूमिकेत दिसेल.


यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला शाहरुखखानचा ‘पठाण’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्याचवेळी सलमानच्या आगमी ‘टायगर३’ मध्ये शाहरुखची पाहुण्या कलाकाराची एन्ट्री फिक्स झाली होती. याचदरम्यान ‘वॉर२’मध्ये हृतिकसह ज्युनियर एनटीआर महत्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे समोर आले. मात्र ‘स्पाय युनिव्हर्स’चा महत्वाचा भाग असलेल्या ‘वॉर 2’ मध्येही सलमान आणि शाहरुखला घ्यायला हवे, असा मुद्दा निर्माते आदित्य चोप्रा यांनी मांडला. दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनीही ही कल्पना लगेचच उचलून धरली.

हे ही वाचा 

कंगना रनौतची अबू सालेम सोबत मैत्री?

‘या’ हवालदारानं सलमानविरोधात साक्ष दिली… मात्र त्यांचा अंत फारच दुर्दैवी ठरला

आता तू मालदिवलाच रहा; चाहत्यांचा सोनाक्षीला चिमटा !

सध्या हृतिक इटली येथे ‘फायटर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात हृतिकसोबत दीपिका पाडूकोणही झळकणार आहे. हृतिक मुंबईत परतताच ‘वॉर 2’च्या शूटिंगला सुरुवात करेल. सलमान ‘बिग बॉस’ रिएलिटी शॉच्या तयारीत आहे. तर शाहरुख नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ चित्रपटाचं यश एन्जॉय करतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)


‘वॉर 2’ हा ‘वॉर’ या मूळ चित्रपटाचा सिक्वल आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या मूळ चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होते आणि वाणी कपूर, आशुतोष राणा आणि अनुप्रिया गोएंका सहाय्यक भूमिकेत होते. या चित्रपटाने २०१९ पर्यंत विकेंड हिंदी चित्रपटाच्या कमाईचे सर्व विक्रम मोडले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी