26 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमनोरंजननुशरत युद्धभूमी इस्त्रायलमधून सुखरूप पोहोचली भारतात

नुशरत युद्धभूमी इस्त्रायलमधून सुखरूप पोहोचली भारतात

इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर अभिनेत्री नुशरत भरुचा अखेरीस रविवारी सकाळी मुंबई विमानतळावर सुखरूप पोहोचली. तिच्या कुटुंबीयांना पाहून ती भावूक झाली. हायफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी ती इस्रायलमध्ये होती. मात्र अचानक युद्ध सुरु झाल्याने ती अडकली. शनिवारी पूर्ण दिवस नुशरत भरुचा संपर्काबाहेर होती. अखेरीस भारतीय दुतावासाने नुश्रतशी संपर्क साधत तिला भारतात सुखरूप आणले. मला आता बोलता येणार नाही, मला घरी जाऊद्या असे अगदी तळमळीने नुशरत भरुचाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंना सांगितले.

इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमासने देशावर हल्ला केला तेव्हा हायफा फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ती इस्रायलमध्ये होती, अनेक नागरिक मरण पावले आणि हजारो जखमी झाले. या घटनेत आपल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी गेलेल्या नुशरत भरुचाच्या हॉटेलजवळही हल्ला झाल्याचे समजते. आपला जीव बचावण्यासाठी नुशरत हॉटेलच्या बॅस कॅम्पमध्ये राहिली. ती शनिवारी दिवसभर संपर्कक्षेत्राच्या बाहेर होती. अखेरीस तिच्या टीमकडून नुशरतशी संपर्क होत नसल्याने जाहीर करण्यात आले. भारतीय दुतावासाच्या मदतीने नुशरतशी संपर्क साधला गेला. ती भारतात विमानानद्वारे परत येत असल्याचे दुतावासाकडून सांगण्यात आले. दोन विमाने बदलून नुशरत मुंबईत परतली. दुबईविमानतळावरुन तिने मुंबईचे विमान गाठले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


मुंबई विमानतळावर प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत तिला पाहून प्रसारमाध्यमांनी तिला गाठले. सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत नुशरत विमानतळाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पत्रकारांनी तिला शेवटपर्यंत घेरले. गाडीपर्यंत जाता येत नसल्याने नुशरतने कळकळीने मला आता घरी जाऊद्या, आता बोलता नाही येणार अशी विनंती केली.

हे ही वाचा 

शाहरुखच्या अभिनेत्रीचा जीवघेणा अपघात, जीव वाचला पण…

भेटा ‘मिशन राणीगंज’ चित्रपटातील खऱ्याखुऱ्या जसवंत सिंग गिल यांना!

तब्बल ३२ वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत एकत्र झळकणार मोठ्या पडद्यावर!

ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘अकेली’ या नुशरतसोबत प्रत्यक्षात झाली आहे. ‘अकेली’ चित्रपटात नुशरत ज्योती नावाचे पात्र साकारतेय. केदारनाथच्या दुर्घटनेत ज्योतीने आपला भाऊ आणि वहिनी गमावल्याने कुटुंबातची जबाबदारी तिच्यावर आली आहे. दरम्यान, विमान कंपनीत काम करणाऱ्या ज्योतीला तिची नोकरीही गमवावी लागते. नाइलाजाने तिला भारत सोडून इराकला नोकरीसाठी जावे लागते आणि तिथे अचानक सुरू झालेल्या गृहयुद्धात ती फसते इतकेच नाही तर आयएसआयच्या कचाट्यातही अडकते. आयएसआयला चकमा देऊन ती इराकमधून भारतात कशी पोहोचते यावर ‘अकेली’ चित्रपट मांडण्यात आला आहे. प्रत्यक्षात चित्रपटाशी साधर्म्य असलेल्या गोष्टी नुशरतसोबत घडल्याने या विचित्र योगायोगातून ती सुखरूप परत आल्याने तिच्या चाहत्यांनी भारतीय दुतावासाचे धन्यवाद दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी