32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमनोरंजनहरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी अडचणीत, अटक वॉरंट जारी, जाणून घ्या संपूर्ण...

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी अडचणीत, अटक वॉरंट जारी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

टीम लय भारी

हरियाणा: हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बॉलिवूड अभिनेत्री सपना चौधरीने आजवर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या दिलखेचकं अद आणि डान्सने तिने अनेक तरुणांना घायाळ केले(Sapna Chaudhary issued arrest warrant in trouble)

‘सॉलिड बॉडी’ या गाण्याने सुपरस्टार झालेली सपना चौधरी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अशातच सपना चौधरीच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे.

Entertainment : इनडोअर खेळांसह चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु होणार, राज्य सरकारची अनलॉक संदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध

मराठी चित्रपटाची कथा पोहचली थेट बॉलीवूडमध्ये, ‘छोरी’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

सपनाविरोधात लखनऊ कोर्टाने अटक वॉरंट जारी केल आहे. (Sapna Chaudhary Dance Programme) सपनाविरोधात फसवणूकीचे आरोप आहेत.(Arrest Warrant Against Sapna Chaudhary)अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शांतनु त्यागी (Additional Chief Judicial Magistrate Shantanu Tyagi) यांनी लखनऊच्या या प्रकरणात सपनाविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २२ नोव्हेंबरला होणार आहे.

सपना चौधरीला अटक केल्यानंतर पोलीस तिला कोर्टात हजर करणार आहेत. या सुनावणीत सपनावरील सर्व आरोप कोर्टाला ठरवायचे आहेत, त्यामुळे तिने कोर्टात हजर राहणे गरजेचे आहे.

मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, खुद्द पत्नीने केली तक्रार

Sapna Chaudhary in trouble, Lucknow court issues arrest warrant

या प्रकरणातील एफआयआरनंतर सपनाने स्वत: विरोधातील तक्रार फेटाळण्यासाठी अर्ज केला होता, तोही अर्जानंतर फेटाळण्यात आला. मात्र आता हे प्रकरण पुन्हा उघड झाले आहे.

नेमकं हे प्रकरण काय आहे?

सपना चौधरीविरोधातील हे प्रकरणी ३ वर्षापूर्वीचे आहे. १४ ऑक्टोबर २०१८ रोजी आशियाना पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत असे म्हटले आहे की, १३ ऑक्टोबर रोजी लखनऊमधील स्मृती उपवन येथे दुपारी ३ ते १० या वेळेत एका शोचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या शोमध्ये ती पोहोचली नाही.

यामुळे शोचे आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, इवाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्यय अशा अनेकांची नावे या तक्रारीत नोंदवण्यात आली आहे.

सपना चौधरीचा हा शो पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते, मात्र दिलेला वेळ उलटून गेला तरी सपना चौधरी या शोला हजर राहिली नाही. त्यामुळे सपना चौधरीला पाहण्यासाठी आलेल्या हजारो प्रेक्षकांनी गोंधळ घातला. या शोसाठी प्रेक्षकांनी ३०० -३०० रुपये देऊन तिकिट विकत घेतले होते.

मात्र सपनाच्या न येण्याने झालेल्या गोंधळानंतरही प्रेक्षकांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी कोर्ट काय निर्णय घेणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी