30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रबुलढाण्यात विष घेतलेल्या एसटी कामगाराचा मृत्यू

बुलढाण्यात विष घेतलेल्या एसटी कामगाराचा मृत्यू

टीम लय भारी

बुलडाणा : एसटीच्या शासकीय विलीनीकरणासोबत इतर काही मागण्यांसाठी एसटीचे कर्मचारी काही दिवसांपासून ‘कामबंद आंदोलन’ करत आहेत. आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे आत्महत्येच सूत्र काही थांबायचं नावच घेतं नाही आहे(ST worker dies of poisoning in Buldhana)

तसेच आज एसटी कर्मचारी संपाचा बारावा दिवस चालू आहे. हे आंदोलन मुंबई मधल्या आझाद मैदानात सुरु आहे. काल संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे.

ST संपात फुटीची चिन्हे ; कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा

मंत्रालयाबाहेर थाटू संसार, गोपीचंद पडळकरांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

बुलढाणामधल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

एकीकडे मागण्यांसाठी आणि विलीनीकरणासाठी संप सुरु आहे तर दुसरीकडे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. या मागणीसाठी खामगाव इथल्या एसटी डेपोत मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या विशाल अंबालकर याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तेव्हा तातडीने त्याला सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेव्हा उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

एसटी मधील २ हजार २९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची नोटीस बजावण्यात आली

मागील तीन आठवड्यांपासून संप करणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर एसटीच्या महामंडळाने त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे एस्टीमधील कंत्राटी कामगारांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे २२९६ कंत्राटी कामगारांना सेवासमाप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. आता कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या  ४३४९ वर गेली आहे.

ST संपात फुटीची चिन्हे ; कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा

St Basil’s boss ‘laughed’ at staff concern

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी