33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमनोरंजनशिल्पा शेट्टी-राज कुंद्राविरुध्द शर्लिन चोप्राची पोलिसांत तक्रार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राविरुध्द शर्लिन चोप्राची पोलिसांत तक्रार

टीम लय भारी

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra Pornography Case) पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यापासून तो चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अभिनेत्री शर्लिन चोप्राचादेखील जबाब नोंदवला होता. त्यावेळी शर्लिनने ऑनलाईन पॉर्न बनवण्याचा आणि तो इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप केला होता. त्यांनतर आता शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात पोलिसात तक्रार (FIR) केली आहे. शर्लिनने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी विरोधात मानसिक आणि लैंगिक छळासह फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे (Sherlyn Chopra lodges police complaint against Shilpa Shetty-Raj Kundra).

फक्त शोषणच केलं नाही तर अंडरवर्ल्डची धमकीसुद्धा दिली

शर्लिन चोप्राने जुहू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिथे तिने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल केली आहे. शर्लिनने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने खुलासा करत म्हटलं आहे, ‘राज कुंद्राने तिचं फक्त शोषणच केलं नाही तर अंडरवर्ल्डची धमकीसुद्धा दिली आहे’.

शिल्पा शेट्टी बनणार एका नव्या रियालिटी शो ची जज

शिल्पा शेट्टीचा सुपर डान्सरमध्ये कमबॅक

Sherlyn Chopra lodges police complaint against Shilpa Raj
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल

एका कॉन्फरन्सदरम्यान ती म्हणाली की, ‘तुम्ही मुलींना त्यांचं अंगप्रदर्शन करण्याचे पैसे का देत नाही? तुम्ही त्यांची फसवणूक का करता? तुम्ही त्याला टोपी का घालता?’ शर्लिन इथेच थांबली नाही, ती पुढे म्हणाली, ‘हा नैतिक व्यवसाय आहे का? तुम्हाला व्यापारी व्हायचे आहे, टाटा व्यवसाय कसा करतात ते शिका.

…त्या बातम्या मानहानीकारक कशा असू शकतात; मुंबई उच्च न्यायालयाचा शिल्पा शेट्टीला उलट प्रश्न

Sherlyn Chopra accuses Raj Kundra and Shilpa Shetty of mental harassment, files complaint

chitra wagh

नैतिकतेसह, आपण जे वचन देता ते पाळता आणि आपण काय करता? तुम्ही कलाकाराच्या घरी जाऊन त्यांचे लैंगिक शोषण करता. तो त्याच्या घरी जातो आणि त्याला अंडरवर्ल्डची धमकी देतो. ते म्हणतात लैंगिक अत्याचाराचे प्रकरण मागे घ्या अन्यथा तुमचे आयुष्य उध्वस्त होईल’.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी