30 C
Mumbai
Monday, September 18, 2023
घरमनोरंजनमुंबईत जन्मलेल्या विक्की कौशलला मराठी भाषेचा लळा; आईसोबतच्या नात्याला मराठीचा गोडवा

मुंबईत जन्मलेल्या विक्की कौशलला मराठी भाषेचा लळा; आईसोबतच्या नात्याला मराठीचा गोडवा

अभिनेता विकी कौशल सध्या ‘द ग्रेट इंडियन फेमिली शॉ’ मुळे चर्चेत आहे. विकीनं ‘कन्हैया ट्विटर पे आजा’ चित्रपटासाठी दणक्यात प्रमोशन केलं. विकी आपल्या आईशी फार जवळीक ठेवून आहे. आपल्या पंजाबी मम्मीला इंस्टाग्रामवर ‘आई’ असं मराठीत उद्देशल्यानं विकीचं सध्या मराठी भाषिकांकडून कौतुक होतंय. आपल्या आईला मिठीत सामावल्याचा विकीनं फोटो पोस्ट केला. फोटोपेक्षाही विकीच्या मराठी भाषेतील केप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं. विकीनं ‘cutiep आई’ असा उल्लेख केल्यानं मराठी कलाकारांनी, फेन्सनी त्याला दाद दिली.

विकीचा जन्म मुंबईत १३ मे रोजी १९८९ साली झाला. मालाडच्या मालवणी परिसरात लहानाचा मोठा झालेल्या विकीला असखलित मराठी बोलता येतं. मी मूळचा पंजाबी, पंजाब राज्यातील होशियारपूर माझं गाव. माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी मुंबई आहे. त्यामुळे मराठी भाषेशी माझी नाळ जुळली आहे. मला खऱ्या अर्थानं मुंबईनं ओळख दिली, असं विकी सांगतो. विकी आपल्या मराठी स्टाफची तसेच सेटवरील कलाकारांशीही मराठीत बोलतो. कित्येकदा आपल्या मराठी सहकलाकाराच्या इंस्टाग्राम पोस्टवरही विकी मराठीत कमेंट पोस्ट करतो. विकीच्या मराठी प्रेमाचे अनेक दाखले आहेत. पापाराझीसह अनेकदा मराठीत बोलताना दिसून येतो. विकी हिंदी, इंग्रजीऐवजी स्वतःहूनच मराठीत गप्पा मारतो, असा अनुभव अनेक मराठी सहकलाकारांनी सांगितला आहे.

हे सुद्धा वाचा 
शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी धक्कादायक
प्राजक्ता कोळीचं एक्स बॉयफ्रेंडसोबत जुळलं… चाहत्यांना दिली गोड बातमी
गणपती उत्सवाचं महत्त्व जाणून घ्या..  

आपल्या एक्टिंग वर्कशॉपच्या काळात अनेक मराठी सिनेमे पाहिलेत, असं विकीनं एका मुलाखतीत सांगितलं. मी आजही मराठी सिनेमे आवर्जून बघतो, असंही विकी म्हणाला. आता विकीची बायको कतरीनाला इतकी वर्ष मराठी बोलणं जमलं नाही. डायलॉग व्यतिरिक्त मराठी मला स्पष्ट बोलता येतं नाही, अशी कतरिनानं प्रांजळ कबुली दिली. आता विकी आपली बायको कतरिनाला कितपत मराठी शिकवतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी