33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईकचरामुक्त होणार मुंबईचा गणेशोत्सव

कचरामुक्त होणार मुंबईचा गणेशोत्सव

गणेश मंडप परिसरात, मिरवणूक मुख्‍य मार्गांवर पालिकेने मोठया संख्येने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पालिकेकडून मूर्ती विसर्जन स्थळांवरही स्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात येत आहे. यंदा देखील गणेशोत्‍सवादरम्‍यान स्‍वच्‍छतेसाठी मनुष्‍यबळ अविरत कार्यरत राहणार असून प्रत्‍येक गणेश मंडपांच्‍या ठिकाणी ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी प्रत्‍येकी दोन कचरा संकलन पेटी (डस्‍टबीन) ठेवण्‍यात येणार आहेत.

मुंबई महानगरातून दररोज ६ ते साडेसहा हजार मेट्रीक टन कच-याची निर्मिती होते. त्‍यातील ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करण्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागाने भर दिला आहे. स्‍वच्छ व सुंदर मुंबई प्रकल्‍प अंतर्गत सन २०३० पर्यंत मुंबई महानगर कचरामुक्तीचे उद्दिष्ट ठेवण्‍यात आले आहे. त्‍या अंतर्गत कचरामुक्‍ती व कचरा दुर्गंधीमुक्तीसाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. उत्सवाच्या काळात घनकचरा संकलनात वाढ होते, हे लक्षात घेता विविध ठिकाणी सामूहिकपणे स्‍वच्‍छता करण्‍यात येत आहे.

रविवारी केंद्र सरकारच्यावतीने आयोजित आंतर शहर स्वच्छता स्पर्धा अर्थात इंडियन स्वच्छता लीग २.० चा भाग म्हणून मुंबईत पालिकेने विशेष स्वच्छता मोहीम राबवली. पालिका अधिकाऱ्यांनी लहान-मोठे सर्व सार्वजनिक रस्ते, पदपथ, गल्ली, झोपडपट्टी व तत्सम वस्ती, समुद्रकिनारे अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता कार्यक्रम राबवला. रस्त्यावरचा कचरा उचलणे, अडगळीच्या वस्तू हटवणे, नाल्यांच्या शेजारी टाकून दिलेला कचरा हटवणे, पदपथ आणि सार्वजनिक भिंतींवर पावसामुळे उगवलेली रोपटी, शेवाळ काढून टाकणे इत्यादी कामे रविवारी आटोपली गेली.

यंदा १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीदरम्यान श्री गणेशोत्सव साजरा होणार आहे. मुंबईत विसर्जनासाठी १९१ कृत्रिम तलाव, ६९ नैसर्गिक तलावांच्या ठिकाणी व्यवस्था आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्वच्छता, झाडांच्या फांद्या छाटणी आदी कामेही पूर्ण केली आहेत. निर्माल्य आणि वैद्यकीय तपसणी पथक,विसर्जनाच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

हे ही वाचा 

गणपती उत्सवाच्या काळात ‘या’ भागात बँक बंद

गणेशोत्सवात मुंबई पोलिसांकडून गणसेवकांची फौज

गणेशोत्सव काळात २४ तास रेल्वे सुरू ठेवा : डॉ. जितेंद्र आव्हाड

गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्‍सव कालावधीत तयार होणा-या निर्माल्‍यावर योग्‍य ती प्रक्रिया करून खत तयार केले जाते. यामुळे समुद्र आणि तलावाचे प्रदूषण रोखण्यास मदत होते.गणेश मंडळांनी निर्माल्‍य व तत्‍सम पदार्थ साठवून ठेवण्‍याकामी व्‍यवस्‍था करावी. निर्माल्‍याचे व्‍यवस्थित वर्गीकरण करावे. ज्‍यापासून खत निर्मिती होणार नाही, असे पदार्थ वेगळ्या डब्‍यात जमा करावे, असे पालिकेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी