26 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरमनोरंजनविजय देवरकोंडाचं गर्लफ्रेंड रश्मिकाबद्दल मोठं वक्तव्य

विजय देवरकोंडाचं गर्लफ्रेंड रश्मिकाबद्दल मोठं वक्तव्य

‘ऍनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर दक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यांनी सोशल मीडियावर गर्लफ्रेंड रश्मिका मंदान्नासाठी आनंद व्यक्त केला. गुरुवारी ‘ऍनिमल’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना महत्वाची भूमिका साकारतेय. रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांचं सिक्रेट अफेअर सुरु असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

परदेशात दोघंही कित्येकदा एकत्र वेळ घालवत असल्याचं दोघांच्या इंस्टाग्राम या सोशल मीडियावरुन सिद्ध झालंय. दोघंही मॉरीशीस तसेच मॉलदीवसला एकत्र गेल्याचं याअधीही अनेकदा दिसून आलंय. मात्र एकमेकांसोबतच्या नात्याबद्दल दोघांनीही कधीही उघडपणे कबुली दिली नाही. आम्ही दोघंही एकमेकांचे चांगले मित्र सल्याचं विजय आणि रश्मिका सांगतात. अशातच विजयनं रश्मिकाच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून एक्स ( पूर्वीचे ट्विटर ) या सोशल मीडियावर माझे प्रियजन रश्मिका आणि संदीप यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया दिली. संदीप रेड्डी ‘ऍनिमल’ चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
‘ऍनिमल’मध्ये रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत अनिल कपूर आणि बॉबी देओल विरोधी भूमिकेत आहेत. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे सुद्धा वाचा 
मुलीने पडद्यावर चुंबन घ्यावे का; रविना टंडन म्हणाली…
गांधीजींचे विचार शिल्लक नाहीत, गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्याने काँग्रेस आक्रमक
रणबीर कपूरच्या वाढदिवशी पत्नी अलिया भट काय म्हणाली?

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या डेटिंगच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून आहेत. गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या तेलगू चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केले होते.विजय देवरकोंडा अलीकडेच सामंथा रुथ प्रभू सोबत खुशी चित्रपटात दिसला होता, तर रश्मिका विजयसोबत तमिळ चित्रपट वारीसुमध्ये शेवटची दिसली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी