27 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमनोरंजनमुलीने पडद्यावर चुंबन घ्यावे का; रविना टंडन म्हणाली...

मुलीने पडद्यावर चुंबन घ्यावे का; रविना टंडन म्हणाली…

९० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेली बॉलीवूड स्टार रवीना टंडन हिने तिच्या कारकिर्दीत कधीही किसिंग सीन केला नाही. मात्र मुलगी राशा चित्रपटात अभिनेत्याला किस करत असल्यास माझी काहीच हरकत नसल्याचं स्पष्ट केलंय. ऑनस्क्रीन किस करावं की नाही हा सर्वस्वी राशाचा निर्णय आहे. ती किससाठी तयार नसेल तर कोणीही राशाला जबरदस्ती करू शकत नाही, असंही रवीनानं बजावलं.

एका मुलाखतीत रवीनानं मुलगी राशाच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबाबत दिलखुलास गप्पा मारल्या. राशा अभिनेता अजय देवगणच्या भाच्यासोबत चित्रपट करतेय. या चित्रपटाचं मध्य प्रदेशात शूटिंगही पार पडलंय. सध्या चित्रपटात किस करणं फारच सामान्य गोष्ट बनलीये.

मात्र रवीनानं सिनेमात कधीच अभिनेत्याला किस केलं नाही. त्या दिवसांमध्ये कोणतेही किसिंग करार नव्हते. पण मीच चित्रपटात किसिंग सीन्स दिले नाही. बलात्काराचे दृश्य शूट करताना मी अंगावर कधीचा फाटलेले कपडे घातले नाही. अभिनेत्यालाही माझ्या अंगावरचे कपडे फाडायला दिले नाही अशी माहिती रविनानं दिली.

हे सुद्धा वाचा 
रणबीर कपूरच्या वाढदिवशी पत्नी अलिया भट काय म्हणाली?
अभिनेता मायकेल गॅम्बन यांचे निधन; हॉलिवुडमध्ये पाच दशकांची कारकीर्द
…तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा इशारा, जव्हारमध्येही परप्रांतीयाची मुजोरी  

रविनाला राशा आणि रणबीर ही दोन मुलं आहेत. राशानं नुकतंच धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कुलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. शिक्षण पूर्ण होताच राशा निर्मात्यांच्या कार्यालयाबाहेर फोटोग्राफर्सला दिसून येऊ लागली. राशा आता बॉलिवूड चित्रपटात आगमन करण्यास सज्ज झाल्याचा कयास सर्वांनी त्यावेळीच लावला. राशा आता हॉटेल्स तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाबाहेर उपस्थित फोटोग्राफर्सला आनंदाने फोटोसाठी पोझ देते. राशानं आपलं इंस्टाग्राम अकाऊंटही फॅन्ससाठी सार्वजनिक केलंय. राशाला बॉलिवूडचा सर्वात देखणा हिरो कार्तिक आर्यन फॉलो करतोय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी