33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनरणबीर कपूरच्या वाढदिवशी पत्नी अलिया भट काय म्हणाली?

रणबीर कपूरच्या वाढदिवशी पत्नी अलिया भट काय म्हणाली?

गुरुवारी अभिनेता रणबीर कपूरनं आपला ४१ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्तानं अभिनेत्री आलिया भट्टनं इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली. माझं प्रेम, माझा सर्वात चांगल्या मित्राचा आणि मला सर्वतोपरी सुख देणाऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशी खास पोस्ट आलिया भटनं लिहिली.

आलिया आणि रणबीर दोघंही सध्या फुल्ल फॉर्ममध्ये आहेत. यंदाच्या वर्षी रणबीरचा तू झूठी मे मक्कार तर आलियाचा रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. ‘गंगुबाई काठीयावाडी’ चित्रपटासाठी आलियाला राष्ट्रीय पुरस्कारही जाहीर झालाय. आपापल्या कामकाजातून वेळ काढत दोन्ही नवरा बायकोनी आपली दहा महिन्यांची मुलगी राहासोबत दीड महिन्यासाठी न्यूयॉर्कमध्ये सुट्टीही व्यतीत केली. रणबीर आणि आलियानं मुलगी राहाला मीडियापासून दूर ठेवलंय. आलिया परदेशात कामानिमित्त असली तरीही राहाला सोबत घेऊनच जाते. रणबीर नुकताच आई नीतूसिंगसोबत गणपती विसर्जनाला दिसला होता. तर आलिया नुकतीच एका ब्रॅण्ड प्रमोशनसाठी परदेश दौऱ्यातून मुंबईत परतली.

हे सुद्धा वाचा 
अभिनेता मायकेल गॅम्बन यांचे निधन; हॉलिवुडमध्ये पाच दशकांची कारकीर्द
…तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा इशारा, जव्हारमध्येही परप्रांतीयाची मुजोरी
जयंत पाटलांनी वाजविली स्वत:चीच टिमकी, अजित पवार गटाने घेतले सगळ्यांना सामावून !

रनबीरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलिया लिहीते की, तू माझं प्रेम, चांगला मित्र, सर्वतोपरी सुख आहेस. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू जादू घडवून आणतोस, असं लिहीत बाजूला बदलेल्या रणबीरला तिनं कोपरखळीही काढली. माझी इंस्टाग्राम पोस्ट तू सिक्रेट इंस्टाग्राम अकाऊंटनं वाचतोय, याची मला कल्पना असल्याचं आलिया म्हणाली.

आलिया सध्या ब्रॅण्ड प्रमोशनकडे लक्ष देत आता केवळ मुलगी राहाकडे लक्ष देतेय. ‘रॉकी और रानी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुलगी राहापासून फार काळ दूर राहिल्यानं आता चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वेळ काढणार नाही. तूर्तास केवळ मुलगी राहाकडे आपण लक्ष देत असल्याचं आलियानं सांगितलंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी