28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रमल्हारराव होळकर यांचे नाव वैद्यकीय महाविद्यालयांस द्या, उद्धव ठाकरेंकडे मागणी

मल्हारराव होळकर यांचे नाव वैद्यकीय महाविद्यालयांस द्या, उद्धव ठाकरेंकडे मागणी

टीम लय भारी

मुंबई :- परभणी येथील नव्यानेच मंजूर झालेल्या शासकीय महाविद्यालयास सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नाव देण्याची मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मल्हारराव होळकर यांचे नाव वैद्यकीय महाविद्यालयांस द्या, उद्धव ठाकरेंकडे मागणी

परभणी जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान ठरणाऱ्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास होळकर साम्राज्याचे प्रमुख सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नाव देण्यात यावे. सुभेदार मल्हारराव होळकर यांचे कार्य महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशवासियांना सुद्धा प्रेरणा घेण्यासारखे आहे. सर्वव्यापक कार्य असणाऱ्या सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नाव परभणी येथील नुकत्याच मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान सरकारने करावा. यांचे नाव या महाविद्यालयास दिल्यास होळकर यांच्या कार्याचा नावलौकिक सर्वसामान्यापर्यंत पोहचणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी