30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशंभर वर्षातील स्क्वाड्रन लीडर च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी एअर मार्शल नाशिकमध्ये दाखल

शंभर वर्षातील स्क्वाड्रन लीडर च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी एअर मार्शल नाशिकमध्ये दाखल

प्रचंड जिद्दीची,चिकाटीची, अतुलनीय शौर्याची आणि प्रखर देशाभिमानाची।। होय,आज अभिमानाने सांगावेशे वाटत आहे. कहाणी रानवड च्या मध्यमवर्गीय शेतकऱ्याचा मुलगा ते थेट स्क्वाड्रन लीडर या सुपर क्लास वन पोस्ट पर्यंत मजल मारणाऱ्या लहुजी बळवंत वाघ यांच्या उत्तुंग गरुड झेपेची. सर्वार्थाने गगनाला गवसणी घातलेल्या दैदिप्यमान सुदीर्घ कारकिर्दीला सलाम करण्यासाठीं एअर मार्शल विभास पांडे यांनी गोविंद नगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कार्याला वाढदिवसानिमित्त केला सलाम. यावेळी एअर फोर्सचे अधिकारी देखील उपस्थित होते.

प्रचंड जिद्दीची,चिकाटीची, अतुलनीय शौर्याची आणि प्रखर देशाभिमानाची।। होय,आज अभिमानाने सांगावेशे वाटत आहे. कहाणी रानवड च्या मध्यमवर्गीय शेतकऱ्याचा मुलगा ते थेट स्क्वाड्रन लीडर ( squadron leader)  या सुपर क्लास वन पोस्ट पर्यंत मजल मारणाऱ्या लहुजी बळवंत वाघ यांच्या उत्तुंग गरुड झेपेची. सर्वार्थाने गगनाला गवसणी घातलेल्या दैदिप्यमान सुदीर्घ कारकिर्दीला सलाम करण्यासाठीं एअर मार्शल (Air Marshal ) विभास पांडे यांनी गोविंद नगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कार्याला वाढदिवसानिमित्त केला सलाम. यावेळी एअर फोर्सचे अधिकारी देखील उपस्थित होते.(Air Marshal arrives in Nashik to laud squadron leader’s work in 100 years )

१९२४ ते २०२४ या १०० वर्षाच्या कारकीर्दीत लहु अण्णा, लहुतात्या, डॅडी व बाबा अशा नावांनी संबोधलं जाणारं, आयुष्याची ७० हुन अधिक वर्षं देशकार्यात समाजकार्यात व्यतीत करणारं, शताब्दी चा उंबरठा ओलांडणारं हे व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थानं आहे. वाघ परिवाराचं व्यक्तिवैभव. १०० वर्षांची जीवन कहाणी काही मिनिटात सांगणं निव्वळ अशक्यच पण तरीही हा छोटासा प्रयास त्यांचं व्यक्तिमत्व परिपुर्ण करणाऱ्या विशेष पैलूंना स्पर्श करण्याचा. वर्ष १९४२ हा कालखंड. दुसऱ्या महायुद्धाचा. पश्चिमेकडून जर्मनी च्या फौजा मध्यपूर्व आशियाखंडाकडे तर पूर्वेकडून जपानच्या फौजा बर्मा सरहद्दीवर येऊन धडकल्या होत्या. तेव्हा नाशिकचे सहकार महर्षी कै काकासाहेब वाघ आणि अन्य समाज धुरीणांच्या सल्ल्यानुसार आणि वडिलांच्या इच्छेनुसार अवघ्या १७ व्या वर्षी मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण असलेला लहू बलवंत वाघ हा उमदा तरुण भरतीपूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन २० एप्रिल १९४२ रोजी वायुसेनेत एअरमन म्हणून दाखल झाला. तेव्हाचे रॉयल इंडियन एअरफोर्स इथून सुरुवात झाली. खडतर परिश्रम आणि संघर्षाची ही कहाणी आहे.

भरती नंतर पहिले प्रशिक्षण लाहोर इथे पूर्ण करून महिना 30 रुपये पगारावर अंबाला इथे सेवेत रुजू झाले. त्यानंतर बंगळूर व पेशावर असं विविध ठिकाणी पोस्टिंग झाले. धाडसी आणि कुशाग्र बुद्धी चे वाघ यांचे वेगळेपण त्यांच्या वरिष्ठांच्या लक्षात येऊ लागले. त्यांची युद्ध काळात नेमणूक कोहार ,पेशावर इथे झाली. तिथे अपुरे मनुष्यबळ असून, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी कमी असूनही मजूर लोकांच्या साह्याने विमानात दारुगोळा भरून आणि इतर तपासणी केले. उजाडण्याच्या आत विमाने पायलट च्या ताब्यात देऊन लढाईवर पाठवण्याचे काम उत्तम पार पाडल्याबद्दल भारतीय वायू सेनेतर्फे मेन्शन इन डिसपॅच या शौर्य पदकाने गौरविण्यात आले.

या पदकामुळे आणि पुढे डिपार्टमेंट च्या परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि चांगले वार्षिक रिपोर्ट घेऊन त्यांची १९६३ साली तांत्रिक विभागात पायलट ऑफिसर म्हणून नेमणूक झाली. १९६२ चे चीन युद्ध,१९६५ चे पाक युद्ध १९७१ चे बांग्लादेश युद्ध शिवाय गोवा-हैदराबाद लढा या आणि अशा ८ युद्धांवर निरनिराळ्या विमानतळावर जाऊन काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक ठिकाणी उत्तम काम केल्याबद्दल १२ लढाईची आणि इतर सैनिक पदकं मिळवली. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर हवाई दल अधिक आधुनिक होत होते. १९५४ मध्ये भारतीय हवाई दलात नव्यानेच दाखल झालेल्या तुफान या विमानाच्या प्रशिक्षणासाठी फ्रान्सला जायची संधी त्यांना मिळाली. पुढे जवळपास १२ देशांची सफर त्यांना घडली. वायूसैनिक म्हणून दाखल झालेले लहु वाघ वायुसेनेतील स्क्वाड्रन लीडर या पदावरून १९७७ साली मोठ्या सन्मानाने निवृत्त झाले. पण निवृत्ती नाही तर जगण्याची नवी आवृत्ती त्यांनी स्वीकारली. निवृत्ती नंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची जिल्हा सैनिक बोर्डावर सैनिक कल्याण अधिकारी म्हणून नेमणूक झाली. इथे ही आपल्या प्रतिमेला साजेशी गौरवपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली. तिथल्या ९ वर्षातील उल्लेखनीय बाबी म्हणजे जिल्हा सैनिक बोर्डाचा ध्वज दिन निधी त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४० हजारावरून अडीच लाख रुपयांवर नीला. शिवाय त्यांच्या च कार्यकाळात १९८१ साली नाशिक मध्ये सर्वात मोठा भरती मेळावा झाला केला.

देश सेवेतली ही कारकीर्द गाजवत असताना रानवड च्या मातीशी आणि माणसांशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. सैनिक बोर्डातून निवृत्त झाल्या वर तिथे ते छान रमले. गायीसाठी मेळवण बनवणे ,गायींचे दूध काढणे, शेतातल्या महादेवा ला रोज अभिषेक करणे असा नित्यक्रम त्यांनी पाळला. वायुसेवेतील नोकरी चोख बजावत असतानाच कौटुंबिक आघाडीवर देखील ते कुठे कमी पडले नाहीत. दुर्दैवाने पत्नी विमल बाईंची साथ फार लाभली नाही. पत्नीच्या निधनानंतर दोन मुली आणि 3 मुलांच्या डॅडींनी मुलांचा उत्तम सांभाळ केला. मुलांना उत्तम प्रतीचं इंग्रजी माध्यमातील शिक्षण ,योग्य संस्कार ,आचार विचार दिले. त्यांनी परिवारातील प्रत्येकाला निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोठ्या मुलीने सुधाने त्याकाळी केलेला प्रेम विवाह. ग्रुप कॅप्टन लक्ष्मणराव भावे , जावई वायुसेनेतील उच्च पदस्थ अधिकारी होते. याचा आजही सार्थ अभिमान आहे त्यांना. नातवंडांचे आजोबा,पतवंडांचे पणजोबा अशी कुटुंबातील छान प्रोमोशन्स स्वीकारताना अगदी जवळच्या माणसांचे मृत्यू देखील पाहिले, सैनिकी बाण्या प्रमाणे बाबांनी अतिशय स्थितप्रज्ञ वृत्तीनं हे कटू सत्य स्वीकारलं,दुःखी झाले पण विचलित झाले नाही,खचले नाही आणि म्हणून च आयुष्याची लढाई ते शंभरी पर्यंत जिंकत आले.
आज थोरल्या सुनबाई श्रीमती लीलाताई ,नातू वरूण, नातसून स्मिता आणि आदीश्री युगंधर या पतवंडांसोबत बाबा अगदी आनंदी समाधानी जीवन व्यतीत करत आहेत. ही पाचही जणं मोठ्या आस्थेने बाबांचा सांभाळ करत आहेत. निवृत्त स्क्वॉड्रन लीडर लहुजी बळवंत वाघ यांच्या आयुष्यातील हा शतक महोत्सवी टप्पा, शतकोत्तर वाटचाली साठी बाबांना उदंड  आरोग्यमयी शुभेच्छ !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी