28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeआरोग्यसुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ डॉ. हिना गावितांनाही डेंग्यूची लागण

सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ डॉ. हिना गावितांनाही डेंग्यूची लागण

लय भारी न्यूज नेटवर्क

नवापूर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता भाजपाच्या खासदार डॉ. हिना गावित यांनाही डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात डेंग्यूसदृश्य आजार बळावला आहे.

ऐन निवडणुकीच्या प्रचाराची धामधून आहे. डॉ. गावित या खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रचार महत्वाचा आहे. पण डेंग्यूच्या आजारामुळे त्यांना आता आराम करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, डॉ. हिना गावीत या स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनी मुंबईच्या जे. जे. रूग्णालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.

जिल्ह्यासह नवापूर शहरात आतापर्यंत शेकडो नागरिकांना डेंग्युची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात शहरातील फरहाण मकराणी (वय 12 वर्षे), अब्दुल खालीक महंमद माकडा (वय 17 वर्षे) यांना डेंग्युची लागण झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डेंग्यूचे वाढते प्रमाण पाहता शहरातील नागरिकांचा आक्रोश वाढला आहे.

गेल्या महिन्यापासून डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. एकूण रुग्णांची संख्या 50 वर गेली आहे. अनेक रूग्ण गुजरात राज्यातील सोनगड, व्यारा, बारडोली, सुरत येथे खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील 30 रुग्ण महापालिका हद्दीतील, तर 20 रुग्ण शहराबाहेरील आहेत. या सर्व घटनांमुळे प्रशासन हादरून गेले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी