28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeआरोग्यपावसाळ्यात तुमचे पण हात-पाय दुखतात का? मग आजच आपल्या आहारात समावेश करा...

पावसाळ्यात तुमचे पण हात-पाय दुखतात का? मग आजच आपल्या आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी 

पावसाळा सुरु झाला आहे. पावसामुळे वातावरणात थंडावा जाणवत आहे. मात्र, यामुळे आपले हात-पाय दुखण्याची समस्या वाढते. हवामानातील आर्द्रता आणि थंडीमुळेही सांधेदुखीचा त्रास वाढतो. तथापि, कधी-कधी शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे वेदना तीव्र होतात. (get relief in bones leg hand pain)

पावसाळा सुरु झाला आहे. पावसामुळे वातावरणात थंडावा जाणवत आहे. मात्र, यामुळे आपले हात-पाय दुखण्याची समस्या वाढते. हवामानातील आर्द्रता आणि थंडीमुळेही सांधेदुखीचा त्रास वाढतो. तथापि, कधी-कधी शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे वेदना तीव्र होतात. (get relief in bones leg hand pain)

या लोकांसाठी लिंबू पाणी पिणे ठरू शकते घातक, जाणून घ्या

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांच्या दुखण्याची समस्या वाढते. कधी-कधी हे दुखणे इतके वाढते की काम करणे आणि रात्री झोपणेही कठीण होते. तुम्हालाही हात, पाय आणि शरीर दुखत असेल तर या गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा. (get relief in bones leg hand pain)

आरोग्यासाठी फायदेशीर चिया बिया आणि काळ्या मनुकाचे पाणी

व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम समृद्ध आहार

दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ-
शरीर निरोगी ठेवण्यासाठी दूध चांगले मानले जाते. दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. गाईच्या दुधात विशेषतः व्हिटॅमिन डी भरपूर असते. तुम्ही दही, पनीर आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ देखील वापरू शकता. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते. (get relief in bones leg hand pain)

फळे आणि संत्री-
संत्र्यामध्येही भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. त्यामुळे रोजच्या आहारात 1-2 संत्र्याचा समावेश करा. याशिवाय इतर फळांचे रस देखील फायदेशीर आहेत. ज्यूस प्यायल्याने शरीराला ताकद मिळेल आणि हाडेही मजबूत होतील.

हिरव्या पालेभाज्या-
हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. यातून शरीराला कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन डी सारखे आवश्यक पोषक घटक मिळतात. हाडांच्या दुखण्याची समस्या दूर होईल आणि शरीर निरोगी ठेवण्यासही मदत होईल.

सोयाबीन आणि धान्य-
तुमच्या आहारात सोयाबीन उत्पादने आणि संपूर्ण धान्यांचे प्रमाण वाढवा. शाकाहारी लोकांसाठी, या दोन्ही गोष्टी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीने समृद्ध मानल्या जातात. याशिवाय सुका मेवा आणि बिया हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

अंडी-
आपल्या आहारात अंड्याचा समावेश जरूर करा. अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने, व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी देखील आढळतात. अंडी तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. आपण दररोज 1-2 अंडी खाऊ शकता. यामुळे शरीराच्या दुखण्यापासून खूप आराम मिळेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी