31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeआरोग्यउन्हाळ्यात 'या' फळांचे करा सेवन अन् मिळवा चमकदार त्वचा

उन्हाळ्यात ‘या’ फळांचे करा सेवन अन् मिळवा चमकदार त्वचा

कडक उन्हामुळं खूप थकवा आणि सुस्तपणा येत असतो. अंगाची लाही लाही होते. काहीही खावावंस वाटत नाही. उन्हाळ्यात डोळ्यासमोर फक्त आणि फक्त पाणी दिसत असतं. यासर्वाचा फटका आपल्या त्वचेवर आणि आरोग्यवर होतो. (Health care) मग या कडक उन्हाळ्यात उष्मघाताचा फटका टाळण्यासाठी आहारामध्ये पाणीयुक्त फळांचा समावेश करा. जेणेकरुन तुमच्या त्वचेवर आणि आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. उन्हाळ्यात काही फळांचे आरोग्यदायी गुणधर्म असल्याने त्यांचे सेवन केल्यास शरीराला फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया त्या फळांबाबत.(Health care in summer Eat These Fruits )

कडक उन्हामुळं खूप थकवा आणि सुस्तपणा येत असतो. अंगाची लाही लाही होते. काहीही खावावंस वाटत नाही. उन्हाळ्यात डोळ्यासमोर फक्त आणि फक्त पाणी दिसत असतं. यासर्वाचा फटका आपल्या त्वचेवर आणि आरोग्यवर होतो. (Health care) मग या कडक उन्हाळ्यात उष्मघाताचा फटका टाळण्यासाठी आहारामध्ये पाणीयुक्त फळांचा समावेश करा. जेणेकरुन तुमच्या त्वचेवर आणि आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. उन्हाळ्यात काही फळांचे आरोग्यदायी गुणधर्म असल्याने त्यांचे सेवन केल्यास शरीराला फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया त्या फळांबाबत.(Health care in summer Eat These Fruits )

कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ मानले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात या फळाचे सेवन नक्की करावे. कलिंगडात ९०% पेक्षा जास्त पाणी असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. पाण्यासोबतच जीवनसत्त्व A आणि C असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम असते. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.

उन्हाळ्यात लिंबू पाण्यामुळे तुमचे शरीर थंड राहते आणि तुम्ही ताजेतवाने राहता. लिंबू पाणी हा व्हिटॅमिन सी घटकासह परिपूर्ण असणारे ड्रिंक्स आहे. हे जीवनसत्व रक्तदाब निंयत्रित ठेवण्यासोबतच स्ट्रोक आणि ह्रदयसंबंधित धोका कमी करण्यासही उपयुक्त ठरते.

उन्हाळ्यात सनस्क्रीन लावताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

लिंबू पाणी ड्रिंक्समध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा भरपूर प्रमाणात असते. त्याचा त्वचेच्या आरोग्यासही फायदा मिळतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा उन्हामुळे त्वचेला होणारे नुकसान भरून काढण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

किवी हे असेच एक फळ आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय किवीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सही आढळतात. किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियम देखील मुबलक प्रमाणात आढळते. हे रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवते आणि तुमचे हृदय मजबूत करते. याशिवाय व्हिटॅमिन ई देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

काळी मान उजळण्यासाठी ‘या’ घरगुती उपायांचा वापर करा

ॲव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम व फोलेट यासह विविध आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे पोषक घटक संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात.

तसेच, ॲव्होकॅडोमध्ये असलेली अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी उत्तम आहे; जे तुम्हाला आजारी पडण्यापासून वाचवते. व्हिटॅमिन सी त्वचेवरील वृद्धत्वाची चिन्हेदेखील कमी करते. ॲव्होकॅडोमध्ये आढळणारे व्हिटॅमिन बी त्वचेच्या नवीन पेशी तयार करण्यास मदत करते; तर जीवनसत्त्वे अ व ई तुमची त्वचा तरुण आणि केस सुंदर होतात.

बडीशेपचे पाणी प्यायल्याने आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे हे खूप महत्वाचे असते. पपई आपल्या शरीरात व्हिटॅमिन-सीची कमतरता पूर्ण करते. शरीरात पुरेसे व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होत नाही. पपईचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून आराम मिळतो. पपई दररोज निश्चित प्रमाणात खाऊ शकतो. उन्हाळ्यात, याच्या सेवनामुळे दिवसभर शरीरात उर्जा राहते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी