29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeआरोग्यचेहऱ्यावर लिंबू लावण्याचे आहेत 'हे' पाच फायदे; पण 'या' दुष्परिणामांपासून रहा सावध

चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे आहेत ‘हे’ पाच फायदे; पण ‘या’ दुष्परिणामांपासून रहा सावध

लिंबू अनेक वेळा आपण जेवणात किंवा चवीला वापरतो. लिंबूमध्ये आढळणारे पोषण व्हिटॅमिन शरीरातील जीवनसत्वाची गरज पूर्ण करते. पण लिंबाचा वापर केवळ खाद्यपदार्थ म्हणून केला जात नाही, तर ते चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी देखील वापरला जातो. तुम्ही तेलकट त्वचा किंवा सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात का? या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचा फेस पॅक वापरू शकता. नैसर्गिकरित्या चमकणाऱ्या त्वचेसाठी घरगुती उपायांच्या यादीत लिंबाचा वापर हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो . लिंबाचा रस थेट चेहऱ्यावर लावू नये कारण ते आम्लयुक्त असल्यामुळे चेहऱ्यावर जळजळ किंवा ऍलर्जी होऊ शकते.

तेलकट त्वचा असलेल्यांसाठी लिंबू फेस मास्क आणि फेस पॅक वापरणे खूप फायदेशीर आहे कारण ते स्कीनवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी लिंबाचा वापर कसा करावा! आपल्या निरोगी त्वचेसाठी लिंबू हा एक अतिशय उत्तम उपाय आहे ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅन निघून जातो. तसेच लिंबाचा वापर केल्याने ते तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्यांपासून दूर ठेवते.

लिंबू त्वचेसाठी चांगले का आहे?
1. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात आढळते, जे अँटी एजिंग म्हणून काम करते.
2. हे चेहऱ्याच्या छिद्रांमधून बाहेर पडणारे तेल नियंत्रित करते, ज्यामुळे मुरुमांपासून आराम मिळतो.
3. काळे ठिपके आणि डाग टाळण्यासाठीही लिंबू फायदेशीर आहे .

हे सुद्धा वाचा 

मुंबईसह कोकणाला बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका, येत्या 24 तासांत वाऱ्याचा वाढणार वेग

औरंजेबाच्या समर्थनार्थ स्टेट्सवरून शरद पवारांची प्रतिक्रिया म्हणाले,…

यावर्षी पाऊस लांबणीवर, शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागले डोळे

त्वचेसाठी लिंबू कसे वापरावे?
1. टॅन काढण्यासाठी
एका भांड्यात टोमॅटो मॅश करून त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा दही मिसळा. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर, हे मिश्रण लावा त्यानंतर 10-15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.
2. स्वच्छ त्वचेसाठी
एका भांड्यात एक छोटी काकडी किसून घ्या आणि त्यात 9-10 थेंब लिंबाचा रस मिसळा. आता हा फेस पॅक स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
3. ग्लोईंग फेससाठी
एका भांड्यात एक चमचा मध, एक चमचा दुधाची पावडर आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. आता हा फेस पॅक चेहरा धुतल्यानंतर लावा आणि 15-20 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
4. सुरकुत्या कमी करण्यासाठी
दोन चमचे एलोवेरा जेल, एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. आता हा पॅक स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
5. हायपरपिग्मेंटेशन
एक चतुर्थांश चमचा हळद, एक चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा गुलाबपाणी मिक्स करा. चेहरा स्वच्छ केल्यानंतर, हे मिश्रण लावा 10-15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी