29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरआरोग्यडॉ. ओमप्रकाश शेटे आयुष्मान भारत अभियानाचे नवीन कक्ष प्रमुख

डॉ. ओमप्रकाश शेटे आयुष्मान भारत अभियानाचे नवीन कक्ष प्रमुख

केंद्र शासनाची आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाच्या म. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्राच्या प्रमुखपदी डॉ. ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती केली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. केंद्र शासनाची आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाच्या म. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून सामन्यांना 5 लाख रुपयांचा फायदा मिळाला आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातून राज्यात डॉ. ओमप्रकाश शेटे यांना बोलवले आहे. ओमप्रकाश यांनी केलेलं काम आणि मिळवलेल्या अनुभवाचा ते पुरेपूर वापर करतील. यामुळे गरजू आणि सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण देखील होतील. दोन्ही योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी आरोग्य कक्ष उभारण्यात आले आहे.

हे ही वाचा

धनूभाऊंची शिष्टाई कामी; जरांगे-पाटलांनी नवव्या दिवशी सोडले उपोषण

मराठा माणसाच्या मदतीला धावले मुस्लीम बांधव… काय झाले होते?

शहाजी बापूंचा काय माज, काय मस्ती एकदम ओकेच

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेटे यांनी काही दुर्गम भागात, नक्षलग्रस्त भागात आपली ऋग्णसेवा पोहचवली होती. यामुळे शेटे यांना फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात संधी दिली आहे. यांच्याबद्दल थोडसं जाणून घेऊयात.

कोण आहे डॉ. ओमप्रकाश शेटे

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सदस्य म्हणून ओमप्रकाश यांनी काम केले होते. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयामध्ये सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा करोडो रुपयांचा फायदा त्यांना झाला आहे. 2014 ते 2019 या वर्षात सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानले. पैशाअभावी सामान्य माणसाचा जीव जाता कामा नये, हा फडणवीसांचा विचार कानाकोपऱ्यात नेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी