25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रशहाजी बापूंचा काय माज, काय मस्ती एकदम ओकेच

शहाजी बापूंचा काय माज, काय मस्ती एकदम ओकेच

मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटले आहे, अशातच आरक्षणावरून कोणत्याही घटना समोर येत आहेत. मराठा समाज आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरला आहे. मराठा मोर्चा आंदोलक मनोज जरांगे-पाटील काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सरकारला मराठा आरक्षणासाठी ४० दिवसांचा कालावधी दिला होता, मात्र सरकारला विहिरीत पडू की आडात पडू असे झाले आहे. यामुळे ४० दिवसात सरकारला काही करता आले नाही. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे-पाटलांनी अंतरवाली सराटीत उपोषण केले आहे. यामुळे आता सरकार पेचात पडले आहे. याच सत्ताधारी पक्षातील शिंदे गटाचे नेते आणि आमदाराच्या वाहन चालकाने मराठा आंदोलकांवर गाडी घालण्याचा प्रकार पंढरपुर येथे (१ नोव्हेंबर) घडला आहे. यामुळे अधिकच वादाची ठिणगी पेटली आहे.

अनेक वर्षांपासून मराठा नेत्यांना मराठा समाजाने मोठे केले आहे. मात्र तरीही मराठा मंत्र्यांना, नेत्यांना मराठा समाजासाठी आरक्षण मिळवता आले नाही. याची चिड मराठा समाजाला सतत येते. याच मराठा समाजातील काही नेत्यांनी आपली घरं भरली आहेत,असे आरोप मराठा आंदोलकांकडून होत आहेत. मात्र जनतेच्या भल्यासाठी कोणताही नेता आता पुढे येत नाही. दरम्यान, मराठा समाजातील नेता आणि आमदार शहाजी बापू हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने ४० आमदारांसह बंड केला, या ४० आमदारांमध्ये शहाजी बापू होते. यावेळी त्यांनी गुवाहाटीला जाऊन ‘काय झाडी काय डोंगर, काय हाटील एकदम ओकेच’, असे गुवाहाटीचे वर्णन केल्याने शहाजी पाटील अधिकच चर्चेत आले होते. मात्र आता शहाजी पाटील वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आले आहेत.

हे ही वाचा

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? औद्योगिक गुंतवणुकीत राज्य पाचव्या स्थानी, गुजरात अव्वल

आरोग्य सेविकांसाठी मंत्री तानाजी सावंतांकडून गोड भेट !

टिकणारे आरक्षण देणार; सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण खूपच चिघळू लागले असून सरकार संभ्रमात आहे. राज्यात काही जिल्ह्यातील गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आले आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही नेत्याने गावात निवडणुकीसाठी येऊ नये. यासाठी मराठा आंदोलक आता संतापले आहेत. दरम्यान, शहाजी बापू हे पंढरपूरला असताना मराठा आंदेलकांनी गावबंदी असल्याने शहाजी बापूंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने आंदोलकांवर गाडी घातली आणि आंदोलक संतापले. यावेळी शहाजी पाटलांना आंदोलकांची माफी मागावी लागली. त्यांनी आंदोलकांचे पाय धरून ‘मी पाया पडतो’ अशी माफी मागून मनधरणी केली असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

शहाजी पाटील आंदोलकांच्या पायाशी

शहाजी पाटलांच्या ड्रायव्हरने चारचाकी गाडी आंदोलकांवर घातली. यावेळी आंदोलकांनी गावबंदी आहे, तरीही कसे आलात असा सवाल केला. यावेळी शहाजी बापू आंदोलकांच्या पुढे झुकले, त्यांनी माफी मागितली. यावेळी मराठा आंदोलकांनी शहाजी बापूंची मस्ती जिरवली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी