27 C
Mumbai
Thursday, November 16, 2023
घरमुंबईमराठा माणसाच्या मदतीला धावले मुस्लीम बांधव... काय झाले होते?

मराठा माणसाच्या मदतीला धावले मुस्लीम बांधव… काय झाले होते?

भारतात हिंदू आणि मुस्लीम समाजात द्वेष निर्माण करून ब्रिटिशांनी आपली पोळी भाजून घेतली. पण देशाच्या स्वातंत्र लढ्यात  मुस्लीम समाजाचे योगदान नाकारता येत नाही. देशातील काही लेखकांनी, विचारवंतांनी, नेत्यांनी, संघटनेने
हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावण्याचे काम केलेले आहे. असे असताना  मुस्लीम देशावर मोठे संकट कोसळले तर मदतीला धावून येतात. 1993 मध्ये किल्लारीला भूकंप झाला. काही क्षणात असलेले नष्ट झाले. मायेची, हक्काची माणसे गाडली गेली. पण नात्यागोत्याचे नसलेली अनोळखी माणसे  मदतीला धावली, यात मुस्लीम, दलितांसह सगळेच समाज मिळेल ती मदत करत होता. ‘समोर एकचि तारा अन, पायतळी अंगार’ या कुसुमाग्रज यांच्या काव्यपंक्तीचा प्रत्यय येत होता.

राज्यात मराठा आंदोलन जोरदारपणे सुरू आहे.मराठा, दलित समाजाच्या विविध पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. असे असताना एक मराठा आरक्षणासाठी जिवाची बाजी लावून उपोषणाला बसला आहे. त्याच्या मदतीला कल्याणमधील मुस्लीम बांधव धावले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सलग नऊ दिवस जरांगे पाटील आमरण उपोषण करायला बसले होते. अन्न-पाण्याविना हे उपोषण सुरू असल्याने त्यांची तब्येत दिवसेनदिवस ढासळत होती.

जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणानंतर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला. असे असताना मुस्लीम समाज त्यांच्या आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहत होता. कल्याणमध्ये गुरुवारी मुस्लीम बांधवांनी खामोश बाबा दर्ग्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सुधारावी व त्यांच्या आंदोलनाला यश मिळावे यासाठी चढवली चादर व दुवा मागितला.

हे सुद्धा वाचा
धनू भाऊंची शिष्टाई कामी आली; नवव्या दिवशी सोडले जरांगे पाटलांनी उपोषण
मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेंची कोर्टात धाव; सुनावणीची तारीख आली समोर
शहाजी बापूंचा काय माज, काय मस्ती एकदम ओकेच

 

कल्याणमध्ये काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अल्पसंख्यांक विभाग काँग्रेस जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

दरम्यान, सरकारचे शिष्टमंडळ हे जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटीमध्ये दाखल झाले. आणि २५ ऑक्टोबरपासून सुरू असलेले उपोषण जरांगे पाटील यांनी मागे घेतल्याने काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आहे. आरक्षणासाठी जीव पणाला लावणारा नेता दुर्मिळ होत असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी