27 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeआरोग्यथायरॉईड पासून असा करा स्वतःचा बचाव

थायरॉईड पासून असा करा स्वतःचा बचाव

थायरॉइड ही एक अशी समस्या ही आहे की, हा आजार झालेल्या एक तृतीआंश व्यक्तींना, त्यांना हा आजार झाल्याची कल्पनाच नसते. हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.गरोदर महिलांमध्ये आणि प्रसूतीनंतर पहिल्या 3 महिन्यांच्या कालावधीत थायरॉइडची समस्या 44.3% महिलांमध्ये आढळते. आज आपण थायरॉइड विषयी जाणून घेणार आहोत

थायरॉइड ही एक अशी समस्या ही आहे की, हा आजार झालेल्या एक तृतीआंश व्यक्तींना, त्यांना हा आजार झाल्याची कल्पनाच नसते(Protect yourself from thyroid). हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.गरोदर महिलांमध्ये आणि प्रसूतीनंतर पहिल्या 3 महिन्यांच्या कालावधीत थायरॉइडची समस्या 44.3% महिलांमध्ये आढळते. आज आपण थायरॉइड विषयी जाणून घेणार आहोत… थायरॉइड ही शरीरातील गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते.या ग्रंथीमधून काही संप्रेरके स्त्रवतात. मेंदू, हृदय, स्नायू व इतर अवयवांचे कार्य नीट सुरू राहावे यासाठी ही संप्रेरके आवश्यक असतात. थायरॉइडमुळे शरीर ऊर्जेचा वापर करते आणि त्याला उबदार ठेवते. म्हणजे, थायरॉइड शरीरासाठी एक प्रकारे बॅटरीसारखे काम करते. या ग्रंथीमधून स्त्रवणारी संप्रेरके प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात स्त्रवली तर थायरॉइडच्या आजाराची लक्षणे दिसून येतात””सामान्यपणे थायरॉइडचा आजार असलेले 80% ते 90% रुग्ण उपचारांनंतर पूर्ण बरे होतात. पण काहींच्या बाबतीत, आजार पूर्णपणे बरा होत नाही. काही रुग्णांच्या बाबतीत गुंतागुंत निर्माण होते. हायपो-थायरॉइडिझमच्या बाबतीत ऑटो-इम्युन सिस्टिम (शरीरातील सुदृढ ऊतींवर आक्रमण करणारी शरीरातील प्रतिकारयंत्रणा) राहते. उपचार घेतल्यानंतरही इतर अवयवांवर ऑटो-इम्युनिटीचे परिणाम दिसून येतातथायरॉइड ग्रंथी शरीरासाठी आवश्यक असलेल्या संप्रेरकांची निर्मिती करू शकली नाही तर त्याला हायपोथायरॉइडिझम असे म्हणतात. एखाद्या खेळण्यातील बॅटरी संपल्यावर त्या खेळण्याची जी स्थिती असते, हायपोथायरॉइडिझम त्याच प्रकारचा आजार असतो. शरीराच्या इष्टतम कार्यक्षमतेपेक्षा कमी क्षमतेने शरीराचे कार्य सुरू असते. अशा रुग्णांना थकवा लवकर येतो.पण थायरॉइड ग्रंथी अति-क्रियाशील असली तर हायपर थायरॉइडिझम होतो. अति प्रमाणात कॅफिनचे सेवन केले तर व्यक्तीची जी परिस्थिती होईल, तशीच परिस्थिती हायपर थायरॉइडिझमच्या रुग्णांची होते.तिसरा प्रकार म्हणजे थायरॉइड ग्रंथीला सूज येणे. याला गलगंड(गॉयटर) म्हणतात. हा आजार औषधांनी बरा झाला नाही तर शस्त्रक्रिया करावी लागते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी