28 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंचा हिंदुत्वाचा नारा, मुंबई - पुण्यात पबचा धिंगाणा !

एकनाथ शिंदेंचा हिंदुत्वाचा नारा, मुंबई – पुण्यात पबचा धिंगाणा !

विशाल अग्रवाल या बिल्डरच्या पोरानं पुण्यात दोघा निष्पापांचे बळी घेतले. पबमध्ये या कार्ट्यानं दारू डोसली होती. ज्या दोन पबमध्ये त्यानं दारू डोसली होती, त्या पबवर दारू खात्यानं कारवाई केलीय. दारू डोसल्यामुळंच पोराचं नियंत्रण हरवलं, आणि त्यानं दोन निष्पाप जिवांचे बळी घेतले. दारू पिण्यासाठी 25 वर्षे वय पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. या कार्ट्याचं वय तर 17 वर्ष होतं.

    विशाल अग्रवाल या बिल्डरच्या पोरानं पुण्यात दोघा निष्पापांचे बळी घेतले. पबमध्ये या कार्ट्यानं दारू डोसली होती. ज्या दोन पबमध्ये त्यानं दारू डोसली होती, त्या पबवर दारू खात्यानं कारवाई केलीय(Eknath Shinde’s Hindutva slogan, Mumbai – Pune pub riot). दारू डोसल्यामुळंच पोराचं नियंत्रण हरवलं, आणि त्यानं दोन निष्पाप जिवांचे बळी घेतले. दारू पिण्यासाठी 25 वर्षे वय पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. या कार्ट्याचं वय तर 17 वर्ष होतं. हे कार्ट भलतंच बिलंदर आणि बिघडी हूई बाप की औलाद आहे. माजी राज्य मंत्री प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांन ट्विट करून तनपुरे दांपत्याच्या मुलाला या बिघडी हुई औलादीने त्रास दिला होता. रॅगिंग केलं होतं.

    पबमध्ये सर्रास कमी वयाच्या मुला – मुलींना दारू दिली जाते. पुण्या आणि मुंबईमधील पबमध्ये डोकावून बघितलं तर टिचभर कपडे घातलेली मुलं – मुली दारू पिऊन थयथयाट करताना दिसतात. पुण्यात कधीमधी कारवाई तरी होते. पण मुंबईत मात्र अशा चंगळवादी व भोगवादी कार्ट्याना मोकळं रान दिलं गेलंय. पबचं कल्चर गेल्या १० – १२ वर्षांत चांगलंच बोकाळलंय. पण एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात या कल्परने उग्र रूप धारण केलंय.
मुंबईत फोर्ट परिसरात दारू खात्याचं कार्यालय आहे. इंग्रजीत या खात्याला एक्साईज असं म्हटलं जातं. मराठीत त्याचं नाव उत्पादन शुल्क असं आहे. नाव काहीही असलं तरी या खात्याचं सगळं काम दारूचंच आहे. त्यामुळं त्याला दारू खातं असंच नाव द्यायला हवं. पण दारूमधील सरकारी भानगडी लोकांना कळू नयेत, म्हणून या खात्याला उत्पादन शुल्क असं गुंतागुंतीचं नाव दिलंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी