31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeआरोग्यउन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे,जाणून घ्या

उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे,जाणून घ्या

कांदा खाणे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. आपल्याकडे रोजच्या जेवणात कांदा कुठल्याना कुठल्या पदार्थात वापरला जातो. सलाडमध्येही कांदा आवडीने खाल्ला जातो. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे अतिशय चांगले मानले जाते.अनेकांना जेवण करताना तोंडी कच्चा कांदा खाण्याची सवय असते. तर काहींना कच्चा कांदा जेवणासोबत लागतोच. मात्र, कच्चा कांदा खावा की नाही असा अनेक जणांना पडलेला प्रश्न आहे. कांदा केवळ जेवणातच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कांद्याचा रस आणि कच्चा कांद्याचे अनेक फायदे होतात. कांद्यात एंटी एलर्जिक, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात.

कांदा खाणे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. आपल्याकडे रोजच्या जेवणात कांदा (Onion) कुठल्याना कुठल्या पदार्थात वापरला जातो. सलाडमध्येही कांदा आवडीने खाल्ला जातो. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे अतिशय चांगले मानले जाते.अनेकांना जेवण करताना तोंडी कच्चा कांदा खाण्याची सवय असते. तर काहींना कच्चा कांदा जेवणासोबत लागतोच. मात्र, कच्चा कांदा खावा की नाही असा अनेक जणांना पडलेला प्रश्न आहे. कांदा केवळ जेवणातच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कांद्याचा रस आणि कच्चा कांद्याचे अनेक फायदे होतात. कांद्यात एंटी एलर्जिक, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. (The benefits of eating onions in summer )

तसेच उन्हाळ्यासाठी कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात कांद्याचा आहारात समावेश केल्यास उष्माघात टाळता येतो. त्यामुळे कांदे खाण्याचे चांगले फायदे आहेत.

१) थंडपणा- कांद्याचा प्रभाव थंड असतो. उन्हाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. कांद्यामधील गुणधर्मामुळे उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच कांदा शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो.

२) उष्माघातापासून संरक्षण- उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी आहारात कांद्याचा समावेश करू शकता. कांद्यामध्ये असलेल्या अनेक घटकांमुळे उष्णतेपासून तुमचे संरक्षण होते.

३) पचन- उन्हाळ्यात पचनाच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी कांदा खाल्ल्याने फायदा होतो. तुम्ही सलाड म्हणून कांदा खाऊ शकता. कांदा पचनक्रिया मजबूत करतो आणि पोट निरोगी ठेवण्यास मदत करतो.

४) प्रतिकारशक्ती – कांद्यामध्ये आढळणारे सेलेनियम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, कांद्याचा आहारात समावेश नक्की करा.

५) मधुमेह- मधुमेहाच्या रूग्णांसाठी कांदा खाणे फायद्याचे मानले जाते. पांढऱ्या कांद्यात आढळणारी क्वेर्सिटीन आणि सल्फर सारखी काही संयुगे मधुमेहविरोधी असतात. ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

6) हाडांसाठी फायदेशीर- कच्चा कांदा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, जो हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. कॅल्शियम ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास देखील मदत करते, ऑस्टिओपोरोसिस हा असा आजार आहे ज्यामुळे हाडांचे नुकसान होते. यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.

7) अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध- कच्च्या कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फेनोलिक्ससह अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या ऊतींच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. अँटीऑक्सिडंट्स कर्करोग आणि हृदयरोगासह तीव्र रोगांचा धोका कमी करण्यास देखील मदत करू शकतात. कच्च्या कांद्यामध्ये ऑर्गनोसल्फर नावाचे कंपाऊंड असते, जे पोट आणि पोटाच्या कर्करोगासह इतर अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. ऑर्गनोसल्फर कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखू शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी