29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहर आणि जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव उत्साहात

नाशिक शहर आणि जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव उत्साहात

श्रीराम भक्त हनुमान जयंती उत्सव नाशिक शहर आणि जिल्ह्यात उतशहतसाजरा झाला.यावेळी भक्तांमध्ये सर्वत्र चैतन्य निर्माण झाले होते. शहर अन् जिल्ह्यातील हनुमान मंदिरांना रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती.दिवसभर महाआरती, हनुमान चालिसा, हनुमान बीजमंत्र पठण, महाप्रसाद वाटपाचे आदी कार्यक्रम झालेश्रीक्षेत्र अंजनेरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र अंजनेरी- येथे मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. या उत्सवाला दोन लाख श्रीराम भक्तांनी हजेरी लावली. यावेळी विश्वविक्रमी महाआरती करण्यात आल्याचे स्वामी भक्तीचरनदास महाराज व स्वामी सोमे स्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.

श्रीराम भक्त हनुमान जयंती (Hanuman Jayanti) उत्सव नाशिक शहर आणि जिल्ह्यात उतशहतसाजरा झाला.यावेळी भक्तांमध्ये सर्वत्र चैतन्य निर्माण झाले होते. शहर अन् जिल्ह्यातील हनुमान मंदिरांना रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती.दिवसभर महाआरती, हनुमान चालिसा, हनुमान बीजमंत्र पठण, महाप्रसाद वाटपाचे आदी कार्यक्रम झालेश्रीक्षेत्र अंजनेरी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र अंजनेरी- येथे मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. या उत्सवाला दोन लाख श्रीराम भक्तांनी हजेरी लावली. यावेळी विश्वविक्रमी महाआरती करण्यात आल्याचे स्वामी भक्तीचरनदास महाराज व स्वामी सोमे स्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.(Hanuman Jayanti celebrated in Nashik city and district )

अयोध्येच्या धर्तीवर अंजनेरीचा विकास व्हावा, यासाठी हनुमान जन्मस्थान संस्था एका तपापासून पाठपुरावा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा अंजनेरी येथे दोन लाख भाविक तसेच साधू-महंतांच्या उपस्थितीत सकाळी ९.४५ वाजता हनुमानाची महाआरती झाली. यानिमित्ताने सामूहिक हनुमान चालिसा पठण तसेच विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
महाआरतीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी हनुमान जन्मस्थान संस्था व अंजनेरी ग्रामस्थांतर्फे मोफत पिण्याच्या पाण्यासह प्राथमिक औषधोपचाराची सुविधा पुरवन्यात आली होती. तसेच अंजनेरी पर्वताचे पावित्र्य राखण्यासाठी स्थानिक व स्वयंसेवकांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

दक्षिण मुखी सोन्या मारुती
सराफ बाजारातील नवसाला पाहणारा श्री दक्षिण मुखी सोन्या मारुती मंदिरात मंगळवारी (दि.२3) सकाळी सहा वाजता जन्म सोहळा झाला. हनुमान जन्म झाल्यानंतर सकाळी व सायंकाळी आरती झाली. यानंतर सर्व भक्तांना २५१ किलो लाडूचा प्रसाद व पंजिरी वाटप करण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी