29 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeराजकीयमैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो; छगन...

मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो; छगन भुजबळांचा भाजपला इशारा

टीम लय भारी

मुंबई :-  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलें आहे. कोणाशी मैत्री करायची हे वाघाच्या मनावर अवलंबून असतो. वेळ पडल्यास वाघ पंजाही मारु शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला दिला आहे (NCP leader Chhagan Bhujbal has warned the BJP that even a tiger can kill a paw if the time comes). 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले होते. त्यानंतर नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील वाघाशी कुणाची मैत्री होत नाही, मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील यावर भाष्य केले आहे.

कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच योगी विरुद्ध मोदी भाजपाने केलेली खेळी ; नवाब मलिक यांची टीका

लसीकरणाचा डेटा सार्वजनिक करू नका या केंद्राच्या आदेशावर नवाब मलिकांचा सवाल

In rural India, people are hiding their Covid-19 infection because of mistrust in the health system

गेल्या काही दिवसांत शिवसेना भाजपविरुद्ध मवाळ भूमिका घेत आहे का, असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. तेव्हा भुजबळ यांनी म्हटले की, राज्याच्या अनेक प्रश्नांची उत्तर केंद्र सरकारकडे आहेत. त्यामुळे जमवून घ्यावचे लागते. परंतु, वाघ कधीही पंजा मारू शकतो, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर भेटीसंदर्भातही भाष्य केले. प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यामुळे अनेक राजकीय पक्षांना यश मिळाले आहे. निवडणूक व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी काही सल्ला दिला तर पवारसाहेब नक्कीच ऐकतील, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले.

यापूर्वी काय म्हणाले होते पाटील?

“आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. तसेच फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. का ते माहीत नाही. पण इकडे जर वाघाशी दोस्ती असती तर अठरा महिन्यांपूर्वीच सरकार आले असते. पण मोदींनी सांगितले तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे. नेत्याचा आदेश म्हटल्यावर आम्ही वाट्टेल ते करू. पण तसे काही जरी घडले तरी निवडणुका या स्वतंत्रपणेच लढविणार,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

काय म्हणाले होते राऊत?

“चंद्रकांत पाटील यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो,” असे संजय राऊत म्हणाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी