32 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeटॉप न्यूजबुमराहला 'आयसीसी प्लेयर ऑफ द मन्थ' पुरस्कारासाठी नामांकन

बुमराहला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मन्थ’ पुरस्कारासाठी नामांकन

टीम लय भारी

ओव्हल : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात भारताने ओव्हलच्या मैदानात इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यामुळे त्याला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मन्थ’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे (Jaspreet Bumrah nominated for ICC Player of the Month).

बुमराहने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात 14 विकेट्स घेतले. त्याचबरोबर त्याने फलंदाजीतही उत्तम कामगिरी केली. त्याने नॉटिंघम मैदानावर 28 धावा केल्या तर, लॉर्ड्सवर नाबाद 34 धावांची खेळी केली.

Tokyo Paralympics : बॅडमिंटनपटू सुहास यथिराजचे रौप्य पदक निश्चित, सुवर्ण जिंकण्यापासून एक पाऊल दूर

कोलकत्ता नाईट रायडर्सच्या वेगवान गोलंदाजाचा भारतीय संघात समावेश

त्याचबरोबर बुमराहने नवा जागतिक विक्रम केला आहे. त्याने या कसोटीमध्ये 100 विकेट्स घेतले आहेत. 25 कसोटीत 100 विकेट्स घेणारे कपिल देव यानांही बुमराहने मागे टाकले आहे. तसेच कसोटीत 100 विकेट्स घेणारा बुमराह हा भारताचा आठवा खेळाडू ठरला आहे.

Tokyo Paralympics : वयाच्या 18 व्या वर्षी रचला इतिहास, प्रवीण कुमारला उंच उडीत रौप्य पदक

Spicy or Flat, It Just Doesn’t Matter for All-Weather Jasprit Bumrah

बुमराह सोबतच इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यानांही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. जो रूटने भारत विरुद्धच्या कसोटी सामन्यात तीन शतक ठोकत ५०९ धावा केल्या. तर शाहीनने पाकिस्तान विरुद्ध वेस्टइंडीज विरुद्ध दोन कसोटी सामन्यात 18 विकेट्स घेतले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी