28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रFocus : जयंत पाटलांची अवस्था : घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी

Focus : जयंत पाटलांची अवस्था : घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी

विनोद मोहिते : टीम लय भारी

इस्लामपूर : “घार उडे आकाशी.. चिंत तिचे पिला पाशी” अशी अवस्था राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची झाली आहे.

जयंत पाटील सध्या मुंबई येथे आहेत. कोरोनाच्या निमित्ताने पालकत्वाची भूमिका बजावत असताना त्यांचे लक्ष सांगली जिल्ह्याकडे आहे. पहिल्या टप्प्यात इस्लामपूर शहरात तब्बल २६ कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने खळबळ माजली होती. मंत्री पाटील यांच्या कल्पकतेने मुंबई येथील वैद्यकीय अधिका-यांची स्वतंत्र टीम मिरज येथे दाखल झाली होती. आतां इस्लामपूर शहर कोरोना रुग्ण मुक्त आहे.

मिरज येथील शासकीय रुग्णालयात कोविड चे उपचार केंद्र सुरू केले आहे. तेथे २४ तास वैद्यकीय पथक कार्यरत आहे. सांगली जिल्ह्यात सुरवातीला इस्लामपूर शहरात चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तातडीने प्रशासनाने इस्लामपूर शहरातील रुग्ण वास्तव्यास असणारा परिसर सीलबंद केला होता. त्या चार रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे विलगिकरण केले होते. आठवड्यात चार रुग्ण असणा-या इस्लामपूर शहरात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्यांची संख्येत वाढ होत गेली. अन् शहरात प्रचंड भीती आणि सन्नाटा पसरला होता.

अशा परिस्थिती इस्लामपूर शहराला कोरोनापूर असे हिणवले गेले. तेव्हा जयंत पाटील यांनी मुंबईतून इस्लामपूर कडे धाव घेतली. सर्व सूत्रे आपल्या हाती घेत कोरोना रुग्ण मुक्ती कडे वाटचाल करण्यासाठी शिवधनुष्य उचलले. मुंबई येथील जे जे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांना मिरजेला रवाना केले. सुरवातीला कोरोना संशयित रुग्णांचा घशातील स्वॅब घेवून तो तपासणी साठी पुणे येथे पाठवावा लागत होता. यामुळे बिलंब लागत होता. ही अडचण लक्षात घेत मंत्री पाटील यांनी कोरोनाची स्वतंत्र लॅब मिरज येथे सुरू केली. यामुळे तातडीने कोरोना तपासणी अहवाल मिळू लागले आहेत. परिणामी या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांसह त्यांच्या कुटूंबाला गरजेनुसार होम अथवा इन्स्टिट्यूट क्वॉरंटाईन करणे शक्य होत आहे.

जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने वैद्यकीय व प्रशासकीय अधिका-यांच्या प्रयत्नाने इस्लामपूर पॅटर्न नावारूपाला आला. याला इस्लामपूर शहरातील नागरिकांनी साथ दिली आहे. संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात टाटा उदयोग समूहाच्या सहकार्याने तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.याचे प्रत्यक्ष काम सुरू होत आहे. मुंबईत थांबून मंत्री जयंत पाटील यांनी राज्यात इस्लामपूर आणि बुलढाणा येथे अशी रुग्णालये मंजूर केली आहेत. लॉकडाउनच्या काळात इस्लामपूर शहरात ६० हजार जेवणाच्या थाळ्या उपलब्ध करून पंधरा दिवस गरजूंना माणुसकीची थाळी उपलब्ध केली होती.

आता मुंबई आणि पुणे येथून स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या कडून कोरोना संसर्ग वाढत आहे. सध्या सांगली जिल्ह्यात २३ रुग्ण कोरोना बाधीत आहेत. नव्याने वाढणा-या रुग्ण संख्येत वाढ होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी यासाठी मंत्री जयंत पाटील हे मुंबई येथून सर्व अधिका-यांच्या दररोज संपर्कात आहेत.

वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सतत संपर्क साधून आहेत. गावात काय? काय? दक्षता घ्यावी याबाबत लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करीत आहेत. या पंधरवड्यात मुंबई येथे विधान परिषदेच्या निवडणुकीत ते व्यस्त होते. पण दररोज प्रशासकीय यंत्रणेच्या संपर्कात मंत्री जयंत पाटील असतात. जणू “घार उडे आकाशी.. चिंत तिचे पिला पाशी” अशी अवस्था त्यांची झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी