32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहाबळेश्वर नगरपालिका टोल मक्तेदाराचे 2 कोटी 19 लाख थकीत

महाबळेश्वर नगरपालिका टोल मक्तेदाराचे 2 कोटी 19 लाख थकीत

टीम लय भारी

पाचगणी : महाबळेश्वर नगरपालिकेला मुख्यउत्पन्न असलेल्या प्रदुषण कर व प्रवासी कराचे मक्तेदाराकडून २ कोटी १९ लाख २३ हजार १७८ रुपये. व्याजासहीत थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेने प्रवासीकर व प्रदुषण कर गोळा करण्याचा ठेका खळतकर कन्सट्रकशन्स कंपनीला देण्यात आला होता (Mahabaleshwar Municipal Toll Monopoly of Tired).

महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी खळतकर कन्सट्रकशन्स कंपनीने करारातील अटी व शर्थीचा भंग केला असल्याची वस्तुस्थिती जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. यापत्रामध्ये खळतकर कन्सट्रकशन्स यामक्तेदार कंपनीने महाबळेश्वर नगरपालिकेच्या टोल मक्तेदारीत व्याजासहीत २ कोटी १९ लाख २३ हजार १७८ रुपये थकीत असल्याचे म्हटले आहे.

महाबळेश्वर – पाचगणीला पर्यटन सुरू होणार; मकरंद पाटील यांची घोषणा

पाचगणी येथे माझी वसुंधरा अंतर्गत वृक्षारोपण

महाबळेश्वर नगरपालिकीने खळतकर कन्सट्रकशन्स कंपनीकडून ठेका काढून घेऊन स्व:ता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्याकडून टोल वसुली सध्यस्थितीत सुरु आहे. मात्र नगरपालिकेचे कोट्यावधी रुपायाचे नुकसान करणाऱ्या ठेकेदारावर कोणतीच कारवाई नसल्यामुळे महाबळेश्वर नगरपालिकेच्या कारभाराबाबत शंकेची पीके वाढताना दिसू लागली आहेत (Doubts about the management of Mahabaleshwar Municipality are growing).

महाबळेश्वर नगरपलिकेच्या प्रदुषण कर व प्रवासी कर संकलन करण्याचा ठेका खळतकर कन्सट्रकशन्स यांना मिळाला होता. नगरपालिकेकडे अटी व शर्थी नुसार बॅक गॅरटीचे रक्कम १ कोटी ३२ लाख, ९७ हजार ५४४ रुपयाची नगरपालिकडे सादर केली नाही. तर नगरपालिकेने खळतकर कन्सट्रकशन्सच्या ठेकेच्या अनामत रकमेतून ५९ लाख ७८ हजार १६६ रुपये वसूल केली आहे. मात्र अनामत रक्कम वसुल करुन देखील महाबळेश्वर नगरपालिकेस चालू वर्षातील २६ चेक पोटी २ कोटी १९ लाख २३ हजार १७८ रुपये येणे बाकी आहे.

Wadhawan : गृह सचिव अमिताभ गुप्तांचा बेफिकीरपणा, बिल्डरला 23 जणांसह महाबळेश्वरला जाण्यासाठी दिली परवानगी

‘Taking orders from Taliban?’ BJP questions Uddhav Thackeray as Maharashtra bans Dahi Handi event

नगरपालिकेने ठेकेदाराला वेळोवेळी फोन करुन, ईमेल करुन व नोटीस देऊन देखील बॅक गॅरेटी रिनीव्हल करुन दिली नाही. प्रदुषण कर व प्रवासी कर मक्तेदाराने ठेका परवडत नसल्याने सदरचा ठेका रद्द करण्याचे नगरपालिकेवर लेखी पत्राने कळवले आहे. मात्र नगरपालिकेने मक्तेदारास ठेका रद्द करण्यात येणार नाही. नगरपालिकेने कायदेशीर कारवाई करण्याचे व आर्थिक नुकसान भरपाई करण्यात येणार असल्याचे मक्तेदाराला कळवले आहे.

महाबळेश्वर नगरपालिकेच कारभार नक्की काय सुरु आहे. नगरपालिकेच्या आर्थिक नुकसान करणाऱ्या ठेकेदाराविरोधात कोणतीच कारवाई न करता. फक्त जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे मार्गर्दशन मागवून कागदी घोडे दामटण्याचा प्रकार महाबळेश्ळवर नगरपालिकेकडून सुरु आहे. मक्तेदाराकडून बॅंक गॅरेटी रिनिव्हल न करता मक्तेदारी तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी सुरु कसा ठेवला हा संशोधनाचा विषय आहे.

Mahabaleshwar Municipal Toll Monopoly of Tired
महाबळेश्वर नगरपालिकेचे आर्थिक नुकसान न होता खळतकर कन्सट्रकशन्स या मक्तेदाराला काळ्यायादीत घालून थकीत रक्कम व्याजासहीत घेण्यात यावी अशी मागणी सर्वमान्य नागरिकांकडून होत आहे

महाबळेश्वरच्या नुतन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी प्रदुषण कर व प्रवासी कराबाबत मार्गदर्शन जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितले होते. जिल्हाप्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी प्रस्तुत प्रकरणी नगरपरीषद व ठेकेदार यांचेच झालेला करारनामा व कार्यादेश विचारात घेऊन प्रलंबित वसुलीबाबत नगरपालिकेने निर्णय घ्यावा असे कळवले आहे.

महाबळेश्वर नगरपालिकेकडून प्रवासी कर व प्रदुषण करात नुकसान न होता नगरपरिषदेच्या भूमीकेबाबत शहरात चर्चा वाढली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेचे आर्थिक नुकसान न होता खळतकर कन्सट्रकशन्स या मक्तेदाराला काळ्यायादीत घालून थकीत रक्कम व्याजासहीत घेण्यात यावी अशी मागणी सर्वमान्य नागरिकांकडून होत आहे.

महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांनी गटातच राजकारण न करता नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान न होता. मक्तेदार खळतकर कन्सट्रकशन्स यांच्यावर काळ्यायादीत टाकून कायदेशीर कारवाई मक्तेदारावर करुन थकीत रक्कम वसुल करण्यात यावी. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरुन नगरपालिकेचा आर्थिक नुकसानीचा जाब मागणार. प्रसंगी शहराच्या हिताकरिता न्यायालये लढा उभारणार आहे.

– राजेश कुभारदरे, माजी जिल्हाप्रमुख शिवसेना,

जिल्हा नियोजन सदस्य सातारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी