26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रजयंत पाटील यांच्या चिरंजिवांचा कौतुकास्पद निर्णय

जयंत पाटील यांच्या चिरंजिवांचा कौतुकास्पद निर्णय

टीम लय भारी

मुंबई :-  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ठाकरे सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण मोफत असले तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देणार असल्याचा निर्णय जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील (Jayant Patil’s Chiranjeev Pratik Patil) यांनी घेतला आहे.

प्रतीक पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे मोठे चिरंजीव आहेत (Prateek Patil is the great survivor of Jayant Patil, State President of NCP and Minister of State for Water Resources). देशाला सध्या मदतीची गरज आहे. देशाचा नागरिक म्हणून आपण एवढी मदत करू शकतो.

महाराष्ट्रात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या किमती 400 ते 600 रुपये आहेत. मात्र राज्य सरकारने 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती देताना 6500 कोटी रुपये लसीकरणावर खर्च करणार असल्याचं सांगितलं. अशा परिस्थितीत आधीच राज्य सरकारची परिस्थिती बिकट असल्यामुळे, आता अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत.

महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण ; ठाकरे सरकारचा निर्णय!

मोदी सरकारच्या फाजिलपणामुळे ऑक्सिजन तुटवडा, पृथ्वीराज चव्हाणांनी डागली तोफ

स्वतःच्या लसीचे पैसे आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देणार आहेत. महाराष्ट्रातील तरूणांना त्यांनी आवाहान केले आहे की, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देखील तुमच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून द्या.

CoWin, Aarogya Setu crash minutes after Covid vaccine registration opens for all adults in India

कोरोनामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. देशात आरोग्य सुविधाचा तुटवडा निर्माण झाला आहे जर आपण मदत केली तर त्यांचा उपयोग आरोग्य सुविधासाठी होऊ शकतो. त्यामुळे आपल्या देशाला, आपल्या राज्याला मदतीचा हातभार लावण्याची सध्या गरज आहे. देशाप्रती, राज्याप्रती असलेली जबाबदारी म्हणून ही भूमिका घेत आहे.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी