27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांनी पुण्यात लॉकडाऊन करण्यास दिला नकार

अजित पवारांनी पुण्यात लॉकडाऊन करण्यास दिला नकार

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही ठिकाणी तर लॉकडाऊन करण्यात आले तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी, महापौर आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अजित पवारांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील लॉकडाऊन बाबत आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘पुण्यात सध्या लॉकडाऊन करण्यात येणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, नियमांची अंमलबजावणी कठोरपणे केली जाईल. नागरिकांनी नियम न पाळल्यास एप्रिलमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल,’ असा इशाराही त्यांनी दिला.

पुणे शहरात १ ते १४ एप्रिल या कालावधीत लॉकडाउन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या प्रस्तावावर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉल येथे आयोजित बैठकीत चर्चा झाली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लॉकडाऊन करण्यास विरोध दर्शवला. लॉकडाऊन केलेल्या शहरांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे लॉकडाऊन नको, असे मत त्यांनी मांडले आहे. तर, आता लॉकडाऊन जाहीर करण्याऐवजी १ एप्रिलला पुन्हा बैठक घेऊन आढावा घ्यावा, अशी सूचना जिल्ह्याधिकारी राजेश देशमुख यांनी केली.

चर्चेअंती अजित पवार यांनी सध्या लॉकडाऊन न घेण्याचा निर्णय जाहीर केला. ‘जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करा. ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी अॅम्बुलन्सची व्यवस्था करा. गरज भासल्यास मनुष्यबळ वाढवा. खासगी रुग्णालयांमध्ये ५० टक्के बेड्स राखीव करा. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करा,’ अशा सूचनाही अजित पवार यांनी यावेळी प्रशासनाला केल्या.

अजित पवार काय म्हणाले…

  • शाळा आणि महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील.
  • लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणी केली आहे की, लवकरच ३१६ वरून ६०० केंद्र होतील.
  • उद्याने सकाळी सुरू राहतील. सायंकाळी बंद राहतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी