30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रजुलै महिन्यात १५ दिवस बँका बंद राहणार

जुलै महिन्यात १५ दिवस बँका बंद राहणार

बँकिंग क्षेत्रात वावरणाऱ्यांसाठी एक काहीशी दुखदायक बातमी आली आहे. जुलै महिन्यात बँक १५ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे मोठे व्यवहार याच महिन्यात उरकून घेतलेले बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. देशभरातील बँका जुलै २०२३ मध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवार पकडून जवळपास १५ दिवस बंद राहणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका खुल्या असतात.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद राहतील आणि काही प्रादेशिक सुट्ट्या राज्यानुसार दिल्या जातील. कारण प्रादेशिक सुट्ट्या संबंधित राज्य सरकारे ठरवत असतात. तसेच बँकिंग नियामकाने रविवारी बँका बंद ठेवणे बंधनकारक केले आहे. जुलै महिन्यात शनिवार आणि रविवार वगळून आठ सुट्ट्या आहेत. सुट्ट्यांची सुरुवात ५ जुलैपासून गुरू हरगोविंदजींच्या जन्मदिवसापासून सुरू होणार आहे आणि २९ जुलै रोजी मोहरमच्या सुट्टीसह संपणार आहे.

काही राज्ये वगळता भारतातील सर्व बँकांना या सुट्ट्या लागू असणार आहेत. दुसरीकडे ७ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारशी निगडीत आहेत. जुलै महिन्यात ५ रविवार आणि दोन शनिवार सुट्टी असणार आहेत. जुलै महिन्यात एकूण १५ सुट्ट्या आहेत. बँकेत कोणाचे फार महत्त्वाचे काम असेल, तर बँकेच्या सुट्ट्या पाहूनच घराबाहेर पडावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

अभियंत्याला हसू आले, अन आमदार गीता जैन यांनी त्याचे गाल लाल केले….

दर्शना पवार च्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम

भवानी देवीने रचला इतिहास, तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये पटकावले कांस्यपदक

एटीएम, रोख ठेवी, ऑनलाइन बँकिंग आणि मोबाइल बँकिंग नेहमीप्रमाणे सुरू राहतील. दुसरीकडे देशातील सर्व बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत. मे महिन्यात RBI ने २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याचे आदेश दिले होते. देशातील जनतेला या २००० रुपयांच्या नोटा सप्टेंबर अखेरपर्यंत जमा करा, असे सांगण्यात आले आहे. ज्यावर सातत्याने काम सुरू आहे. जर एखाद्याला जुलैमध्ये २००० रुपयांच्या नोटा मिळाल्या आणि त्या बँकांमध्ये जमा करायच्या असतील तर अशा लोकांना बँकेच्या सुट्टीनुसार त्याचे नियोजन करावे लागेल.

बँकेच्या सुट्ट्यांची यादी

२ जुलै २०२३: रविवार
५ जुलै २०२३: गुरू हरगोविंद सिंग जयंती (जम्मू, श्रीनगर)
६ जुलै २०२३: MHIP दिवस (मिझोरम)
८ जुलै २०२३: दुसरा शनिवार
९ जुलै २०२३: रविवार

११ जुलै २०२३: केर पूजा (त्रिपुरा)
१३ जुलै २०२३: भानू जयंती (सिक्कीम)
१६ जुलै २०२३: रविवार
१७ जुलै २०२३: यू तिरोट सिंग डे (मेघालय)

२१ जुलै २०२३: ड्रुकपा त्से-झी (गंगटोक)
२२ जुलै २०२३: चौथा शनिवार
२३ जुलै २०२३: रविवार
२९ जुलै २०२३: मोहरम (जवळजवळ सर्व राज्यांमध्ये)

३० जुलै २०२३: रविवार
३१ जुलै २०२३: हुतात्मा दिन (हरियाणा आणि पंजाब)

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी