31 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना काळातील अपयश लपवण्यासाठी ‘बनारस मॉडेल’ ; नवाब मालिकांची बोचरी टिका

कोरोना काळातील अपयश लपवण्यासाठी ‘बनारस मॉडेल’ ; नवाब मालिकांची बोचरी टिका

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोना संक्रमणाविरूद्ध लढण्यासाठी बनारस मॉडेलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते. कोरोना काळातील अपयश लपवण्यासाठीच देशातील कोरोना रोखण्यात ‘बनारस मॉडेल’ उत्तम असल्याचा प्रचार केला जात असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे (Nawab Malik criticizes ‘Benaras model’ for promoting corona in the country to cover up failures of Corona era).

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. बनारसच्या घाटावरील प्रेतांवर अंत्यसंस्कार करायला जागा नव्हती. लोकांनी प्रेते गंगा नदी टाकली. या घटनेची देशभर आणि जगभर चर्चा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘बनारस मॉडेल’ (‘Benaras model’) बनवण्यासाठी डीएम, डॉक्टर्स, हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी चर्चा केली. देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ‘बनारस मॉडेल’ (‘Benaras model’) चा प्रचार करण्यात येत आहे. कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी हा प्रयत्न आता केला जातोय, असा दावा नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

10 वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार? ; विद्यार्थाचे भविष्य धोक्यात

आकाशातून नाही तर जमिनीवरून पाहणी करणार, मुख्यमंत्र्याचा मोदींना टोला

Barabanki mosque demolition: Police book eight for alleged fraud in registration of the building

‘बनारस मॉडेल’ हे ‘निदान मॉडेल’सारखे फेल

पण ‘बनारस मॉडेल’ (‘Benaras model’) असा काही प्रकारच नाही. बनारसमध्ये ना टेस्टींग होत होती, ना उपचार होत होते. औषधांचा काळाबाजार झाला. ऑक्सिजन काळयाबाजाराने विकला गेला. ‘बनारस मॉडेल’ (‘Benaras model’) हे ‘निदान मॉडेल’ सारखे फेल गेले आहे. त्यामुळे बनारस मॉडेलचा (‘Benaras model’) प्रचार बंद करा, असे ही ते म्हणाले.

जबाबदारी निश्चित करा

यावेळी त्यांनी ओएनजी दुर्घटनेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओएनजीसीचा बार्ज बुडाल्याने निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला असून याची जबाबदारी निश्चित करा आणि संबंधितांना शिक्षा करा, अशी मागणी त्यांनी केली. ओएनजीसीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गुरुवारी केली होती. परंतु पेट्रोलियम मंत्रालयाकडून त्या बार्जवरील कॅप्टनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा गुन्हा कॅप्टन पुरता मर्यादित न ठेवता संबंधित कंपनीचा मालक, ठेकेदार आणि ओएनजीसीचे प्रिन्सिपल एम्प्लॉयर यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोदींचा संवाद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवलेला असतानाच तिसऱ्या लाटेचे संकट ही घोंघावू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणासी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदी अत्यंत भावूक झाले होते. तिसऱ्या लाट भयंकर आहे. त्यामुळे या लाटेत लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला मोदींनी या डॉक्टरांना दिला. आपण वाराणासीमध्ये कोरोना रोखण्यात यश मिळवले आहे. परंतु आता वाराणासी आणि पूर्वांचलमधील गावे वाचवण्यावर लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे. ‘जिथे बिमार, तिथेच उपचार’ हा कानमंत्र लक्षात ठेवून आता काम करावे लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी