27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या सातपूर कॉलनीत जबरी घरफोडी ;  तब्बल १९ तोळे दागिन्यांसह रोख...

नाशिकच्या सातपूर कॉलनीत जबरी घरफोडी ;  तब्बल १९ तोळे दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला

नाशिकमध्ये  दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख वाढत असून घरफोडीच्या घटनेतही वाढ होताना दिसत आहे. सातपूर कॉलनी येथील श्री दक्षिण मुखी इच्छा पूर्ती साईनाथ मंदिर जवळ निळधारा सोसायटीत काही अज्ञात चोरट्यानी मंगळवारी (दि.७) रात्री बंद घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले १९ तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने व दोन लाख रुपये लंपास कयाची घटना घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,रमेश नामदेव महाले हे आठ हजार कॉलनीत कुटुंबीयांसह राहतात. संपूर्ण कुटुंबं सोमवारी (दि.६) मुंबईला गेले होते. याचदरम्यान, काही चोरट्यानी आत प्रवेश करून वेगवेगळ्या खोल्यांमध्ये असलेल्या कपाटातील १९ तोळे सोन्या-चांदीचे दागिण्यासह दोन लाख रुपयांची रोकडही लंपास केले आहे.

घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत श्वान पथकासह घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहे. दरम्यान माजी नगरसेवक सलीम शेख यांनी घटनास्थळी भेट देत आरोपीना शोधत महाले यांना न्याय द्यावा असे सांगितले.
दरम्यान याप्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ उपस्थित होते.

या घटनेमुळे नागरिकांना पुन्हा यापूर्वी घडलेल्या घटनेची आठवण झाली आहे .  सातपूर परिसरातील अशोकनगरमध्ये भांडी पॉलिश करण्याचे काम करणाऱ्या दोघांनी ६० वर्षीय महिलेचे १ लाख ५३ हजारांचे दागिने पॉलिश करून देण्याचे बहाण्याने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहेश्रीमती दर्शना सुरेश गोयल (रा. मॉडन स्कूलच्या मागे, अशोकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. १५) सकाळी दहा-साडेदहा वाजेच्या सुमारास ३५ ते ४५ वयोगटातील दोन अज्ञात इसम भांडे पॉलिश करण्याचे काम करणारे आले होते. त्यांनी परिसरातील काही ग्राहकांची भांडी पॉलिश करून दिली. श्रीमती गोयल यांचीही भांडी पॉलिश केली.

त्यावेळी संशयितांनी त्यांना, तुमच्याकडील सोने असेल तेही पॉलिश करून देणे असे म्हणून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनीही घरातील १ लाख ५३ हजार ३०० रुपयांचे विविध प्रकारे सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्यासाठी दोघा संशयितांकडे दिले.. संशयितांनी ते दागिने पॉलिशच्या बहाण्याने घेऊन श्रीमती गोयल यांची नजर चुकवून हातचलाखीने काढून घेतले आणि त्यानंतर बंद भांडे त्यांच्याकडे देत जरावेळाने उघडण्यास सांगितले.
त्यानंतर संशयित पसार झाले. श्रीमती गोयल यांनी ते भांडे उघडून पाहिले असता त्यात दागिने नव्हते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सातपूर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी