30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी दाखवली ३० देशांच्या नामवंतांना भारतीय संस्कृती

मुख्यमंत्र्यांनी दाखवली ३० देशांच्या नामवंतांना भारतीय संस्कृती

भारतीय संस्कृती जगातील सगळ्यात उज्ज्वल संस्कृती म्हणून ओळखली जाते. या संस्कृतीची ओळख खास गणेशोत्सवात झाली तर… हेच औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी ३० देशांच्या राजदुतांना खास सन्मानित केले होते. त्यांनी भारतीय संस्कृतीचे कौतुक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता फक्त राज्य, देश या पातळीवर प्रसिद्ध नसून जगभरात त्यांचे नाव गाजत आहे. एक सामान्य व्यक्तीही मुख्यमंत्री बनू शकतो, याचे ते अनोखे उदाहरण आहे. अशा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह, शाहरुख खान, सलमान खान, जॅकी श्रॉफ, आमिर खान अशा महत्वाच्या मंडळींनी भेटी देत बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

मंगळवारी पत्रकार, वरिष्ठ अधिकारी आणि ३० देशांच्या राजदुतांना निमंत्रित करण्यात आले होते. यात बाहरिन, युक्रेन, अमेरिका, युगांडा आदी देशांच्या राजदूत मंडळींचा समावेश करण्यात आला. यावेळी अमेरिकेचे मंत्रीही आले होते. या सगळ्या पाहुण्यांनी सरबराई पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले, शिवाय भारतीय संस्कृती खूप विशाल, उद्दात्त असल्याचे आवर्जून सांगितले. दरम्यान, यावेळी वेळात वेळ काढून मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार मंडळींशी संवाद साधला.


राज्यात सव्वा वर्षापूर्वी सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ते पायाला भिंगरी बांधून राज्य पिंजून काढत आहेत. विविध समाजोपयोगी उपक्रम, निर्णय घेऊन अल्पावधीत लोकप्रिय झालेले आहेत. दिवसातील १६ तास काम करत असतात. यातून ते काही थकत नाहीत. हा उत्साह त्यांच्यात ते अध्यात्माची आवड, श्रद्धा असल्यानेच येत असावी, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते.

हे ही वाचा 

मंत्रालयात उड्या मारणाऱ्यांवर जाळीचे कोंदण !

सरकारी कर्मचाऱ्यांची चंगळ; सुट्ट्यांची मजा !

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुस्लिमांबद्दल पुतणा मावशीचे प्रेम, पदाधिकाऱ्याचा पक्षाला ‘रामराम’

शिवसेना ठाणे जिल्ह्यात रुजविण्याचे काम आनंद दिघे यांनी केले. त्यांचे आशीर्वाद घेऊन शिंदे यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. आधी शाखाप्रमुख नंतर नगरसेवक, सभागृह नेते, दिघे यांच्या अकाली जाण्याने ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी खांद्यावर आलेली. अशाही परिस्थितीत शिंदे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी यशस्वी सांभाळत, जिल्हा पिंजून काढला. कार्यकर्त्यांचे जाळे विणले. त्यामुळेच एकनाथ शिंदे जिल्हाप्रमुख असताना शिवसेना अधिक वेगाने वाढली.

दिघे हे समाज सेवेला खूप महत्व द्यायचे. शिवाय अध्यात्म हा त्यांचा हळवा कप्पा होता. तोच वारसा एकनाथ शिंदे यांनी पुढे नेण्याचे काम केलेले आहे. दिवसातील काही तास ते समाज सेवेसाठी देतात. शिवाय वेळ मिळाल्यावर श्रधेपोटी ते विविध मंदिरांना भेटी देतात. गणपती हा त्यांचा श्रध्देचा प्रांत. गणेशोत्सवाचा आनंद समाजातील सगळ्याच मंडळी सोबत घेता यावा यासाठी त्यांनी राजकीय मंडळी, सिने कलाकार, विविध देशातील राजदूत, पत्रकार, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले, शेतकरी, श्रमिक अशा सगळ्यांना आपल्या वर्षा निवासस्थानाच्या गणेशोत्सवाचे निमंत्रण दिले. त्यानुसार समाजातील सगळ्या मंडळींनी बाप्पाचे दर्शन तर घेतलेच, शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली याचे अनेकांना कौतुक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी