27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्र12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी)ची परीक्षा पार पडली. या परीक्षेचा निकाल मंगळवारी (21 मे 2024) जाहीर होणार आहे. या संदर्भात शिक्षण मंडळाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.इयत्ता बारावीचा निकाल २१ किंवा २२ मे रोजी जाहीर करण्याची तयारी बोर्डाने केली आहे. निकालाची अंतिम तारीख पुढील दोन दिवसांत जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) (Class 12 results)ची परीक्षा पार पडली. या परीक्षेचा निकाल मंगळवारी (21 मे 2024) जाहीर होणार आहे. या संदर्भात शिक्षण मंडळाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.इयत्ता बारावीचा निकाल (Class 12 results) २१ किंवा २२ मे रोजी जाहीर करण्याची तयारी बोर्डाने केली आहे. निकालाची अंतिम तारीख पुढील दोन दिवसांत जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.(Class 12 results, results to be declared on May 21)

महाराष्ट्र बोर्डाने यावर्षी १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या. तर बारावीच्या परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत पार पडल्या. बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्रा तील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दहावीसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे बारावीची परीक्षा पार पडल्यावर आता सर्व विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा होती ती निकालाची. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे. कारण, बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले आणि आता मंगळवारी म्हणजेच 21 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत वेबसाईटवर मंगळवार (दिनांक 21 मे 2024) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी