28 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्रदिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या नातवाचे निधन

दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या नातवाचे निधन

दिवंगत नेते कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या नातवाचे निधन झाल्याची माहीती समोर आली आहे. कार अपघाताने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पानसरेंच्या नातवाचा अपघात झाला आहे. अमित स्मिता बन्सी सातपुते असे त्यांचे नाव असून त्यांचे वय वर्षे ३३ होते. भारतीय महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्षा कॉ. स्मिता व भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सचिव कॉ. ॲड. बन्सी सातपुते यांचे ते पुत्र होते. त्यांचा पॉल्ट्रीफार्मचा व्यवसाय होता. हा अपघात अहमदनगर जिल्ह्यात झाला. हा अपघात होता की अमित यांच्या विरूद्ध रचलेला कट असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अमित यांच्या झालेल्या अपघातात कोणाचे तरी षडयंत्र आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. अहमदनगर जिल्ह्यातील भेंडा येथून ते जात असताना भरधाव वेगात आलेल्या चारचाकी स्कॉर्पीओ कंपनीच्या गाडीने अमित यांच्या गाडीला ठोकर दिली होती. यावेळी त्यांच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेले होते. यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. यामुळे ते जागीच ठार झाले. यानंतर त्यांना शव विच्छेदन करण्यासाठी नेवसे फाटा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा

अग्निवीर योजनेवरून रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली

पडळकर सरकारवर घसरले, धनगर आरक्षणासाठी काय केले?

अखेर जरांगेंचं ठरलं, आता आरपारची लढाई

रविवारी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास अमित दुचाकीवरून येत होते. तर अशावेळी नगर जिल्ह्यातील नेवासी तालुक्यातील भेंडा येथे व्यंकटेश ज्वेलर्सजवळ हा अपघात झाला आहे. अमित हे नेवासी तालुक्यातील चिंचोली येथे राहणारे होते. हा खरच अपघात होता का? असा सवाल उपस्थित होतोय. यावेळी ठोकर दिलेली गाडी लोकांनी ताब्यात घेतली. मात्र वाहन चालकाने घटनास्थळावरून पळवाट काढली आहे. अशी माहीती एका ट्रक ड्रायव्हरने दिली. वाहन चालकाने पळवाट काढल्यावरून हा नक्की घातपात होता की अमित यांना मारण्याचा कट यावरून वेगवेगळ्या चर्चांवर तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र अजूनही यावर ठोस पुरावा आणि माहीती मिळाली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी