33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनपरीक्षेत कॉपी करायची आहे? आयुष्यमान खुरानाकडून टिप्स घ्या

परीक्षेत कॉपी करायची आहे? आयुष्यमान खुरानाकडून टिप्स घ्या

‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर अभिनेता आयुष्यमान खुरानाची हवा आता विरत चालल्याची चर्चा आहे. गेल्या दोन वर्षापासून आयुष्यमान खुरानाचे चित्रपट फारसे चालत नाहीयेत. बॉलीवूड बादशाह शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाच्या दोन आठवड्यांअगोदर ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात कसेबसे शंभर कोटी कमावले. त्यातच खुश झालेल्या आयुष्यमान खुरानाने आता परीक्षेत कॉपी कशी करायची, याची विचारणा केलीये.

आयुष्यमान खुराना इंस्टाग्राम या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी तो इंस्टाग्रामचा वापर करतो. आयुष्यमान आपल्या नवीन प्रोजेक्ट बद्दल इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असतो. आयुष्यमानला त्याच्या चाहत्याने परीक्षेत कॉपी करण्यासाठी इंस्टाग्रामवर टिप्स विचारल्या. आपल्या चाहत्याला आयुष्यमानने हटके रिप्लाय दिला. इंस्टाग्रामवर चाहत्याने आयुष्यमानला प्रश्न विचारला, “सर माझी बारावीची बोर्डाची परीक्षा जवळ येत आहे, कृपया कॉपी करण्यासाठी काही टिप्स द्या.” आयुष्यमान म्हणाला,”कॉपीच्या चिठ्ठ्या इतक्या मनापासून बनवा की चिठ्ठी मध्ये लिहिलेलं सगळं लक्षात राहील.”

आयुष्यमानने चाहत्याला थेट अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचं सुचवलं. अभ्यास करताना पुस्तकात न पाहता उत्तराचं स्मरण करायचं आणि चिठ्ठीत लिहून काढायचं जेणेकरून अभ्यास चांगला पाठ होईल, असा अप्रत्यक्षरित्या प्रेमळ सल्ला आयुष्यमानने चाहत्याला दिला. आयुष्यमानच्या हजरजबाबी उत्तराचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)


यंदाच्या वर्षात आयुष्यमानचे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरलेत. २०२१ साली आयुष्यमानचा ‘ड्रीम गर्ल’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. आयुष्यमानच्या वाढत्या फॅन क्रेझने सिनेमा हिट ठरला. मात्र यंदाच्या वर्षात सिनेमाच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी नाकारले. आयुष्यमान आणि अनन्या पांडेच्या जोडीवर बऱ्याच जणांनी नाराजी व्यक्त केली. दोन्ही कलाकारांमध्ये जवळपास १४ वर्षांचे अंतर आहे. अनन्याला एक्टिंगचा गमभनही येत नसल्याने चित्रपटाचा व्यवसायावर नकारात्मक परिणाम दिसून आला. ‘ड्रीम गर्ल 2’ भारतात चालला नाही. परदेशात चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

हे ही वाचा 

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार?

करीनाच्या ‘द बकिंगहॅम मडर्स’ची चर्चा, लवकरच झळकणार ‘मामी’मध्ये!

चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने सलमान खानने घेतला ‘हा’ निर्णय

आयुष्यमान व्यावसायिक जीवनापेक्षा खाजगी जीवनातील चर्चेत आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच आयुष्यमानने आपल्या वडिलांना गमावलं. आयुष्यमानच्या बायकोने स्तन कर्करोगासारख्या घातक आजारावर मात केली. आयुष्यमान सामाजिक विषय मांडणारे चित्रपट करतो. गेल्या दोन वर्षापासून त्याची क्रेझ कमी होत चालली आहे. आपल्या आगामी चित्रपटाबद्दल तपशीलवार माहिती देणे आयुष्यमान आता टाळतोय. आयुष्यमान आतातरी वेबसिरीजकडे वळणार का? असा प्रश्न चाहत्यांनी सोशल मीडियावर विचारलाय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी