30 C
Mumbai
Monday, September 18, 2023
घरमहाराष्ट्रकोकणवासीय गणेश भक्तांना वाहतूक कोंडी आणि खड्ड्याचे विघ्न

कोकणवासीय गणेश भक्तांना वाहतूक कोंडी आणि खड्ड्याचे विघ्न

गणपती उत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना वीकेंडला वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या संख्येने खड्डे असल्याने वेळेत आपल्या गावी पोहोचताना गणेश भक्तांना वेग मर्यादेचं पालन करावं लागलं. वाहतूक कोंडीमुळे तासनतास एकाच ठिकाणी गाडी अडकून राहिल्यानं विकेंडचा प्रवास चाकरमान्यासाठी मोठी डोकेदुखी ठरला.

रायगडमधील पनवेलपासून ते रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबापर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम अत्यंत जुन्या गतीने सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा ते संगमेश्वर तुरळ भागातील महामार्गावर अनेक खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे हा भाग अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे. रत्नागिरीतील हातखंबाच्या पुढे कोके जेवठर भागात महामार्ग उघडलेला आहे.

शुक्रवारपासूनच मुंबई गोवा महामार्गावर अलिबाग, माणगाव येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांची वर्दळ असूनही चाकरमनी गणेशभक्तांना वाहतूक कोंडीतूनच प्रवास करावा लागला. शनिवारी दुपारनंतर वाहतूक कोंडी जास्तच वाढली. एसटी बस, खाजगी ट्रॅव्हल बस, चारचाकी वाहने यामुळे रविवारी रात्रीपर्यंत वाशी, पेण,इंदापूर,माणगाव, कशेडी घाट या ठिकाणी वाहतूक कोंडी होती.

हे ही वाचा 

गणपती उत्सवाच्या काळात ‘या’ भागात बँक बंद

गणरायाच्या आगमनाअगोदर रस्ते खड्डेमुक्त करा; अश्विनी भिडे यांचे आदेश 

कोकणकरांना गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी भाजपची नमो एक्स्प्रेस धावली!

महामार्गावर अवजड बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 18 वाहनांवर पेण आरटीओ कार्यालयाने गुन्हा दाखल केला. रायगड जिल्हा पोलीस विभागाकडून मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६ आणि पाली फाटा वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (अ) या महामार्गावर विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे. गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी राज्य सरकारने सुविधा केंद्र उभारली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी