28 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरमहाराष्ट्रकोकणकोकणकरांना गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी भाजपची नमो एक्स्प्रेस धावली!

कोकणकरांना गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी भाजपची नमो एक्स्प्रेस धावली!

गणेशोत्सवासाठी मुंबईतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोकणी माणूस आपल्या गावी जातो. त्यामुळे रेल्वे गाड्यांचे, बसेसचे आरक्षण काही महिने अगोदरच फूल झालेले असते. त्यामुळे कोकणी लोकांना गणेशोत्सव काळात आपल्या घरी जाता यावे यासाठी मुंबई भाजपच्यावतीने रेल्वे आणि बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी दादर ते सावंतवाडी नमो एक्सप्रेसचा (कोकण गणपती स्पेशल ट्रेन) आज मुंबईतून प्रस्थान झाले.

गणेशोत्सवाला कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी अनेकदा आरक्षण न मिळाल्याने मोठी गैरसोय होत असते. त्यातच मुंबई गोवा महामार्गाचे काम देखील गेल्या कित्तेक वर्षांपासून अर्धवट असल्याने गणेशोत्सवाला कोकणात जाणे म्हणजे कोकणकरांसाठी एक दिव्यच झाले आहे. त्यामुळे मुंबईतील कोकणकरांना गावी जाण्यासाठी भाजपच्यावतीने वाहनांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आज दादर ते सावंतवाडी नमो एक्सप्रेसचे प्रस्थान मुंबईतून झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. आज संपूर्ण ट्रेन भरुन कोकणकडे रवाना झाली.

हे सुद्धा वाचा 
जेडीयू-आरजेडी युती तेल आणि पाण्यासारखी…असे का म्हणाले अमित शाह ?
महिलांच्या चिडचिड्या स्वभावावर आलयं औषध
मृणालच्या करिअरला चार चाँद; दुबईत झाला मोठा सन्मान

यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडवणीस म्हणाले, महाराष्ट्रात गणेशोत्सव सर्वात मोठा उत्सव असतो. विशेषत: मुंबईतून मोठ्याप्रमाणात मराठी माणूस कोकणात गणेशोत्सवाला आपल्या घरी जातो. त्यांची व्यवस्था व्हावी म्हणून भारतीय जनता पक्ष सहा रेल्वे गाड्या आणि् 338 बसेसची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून या लोकांना आपल्या घरी जावेत यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सहकाऱ्यांनी ही व्यवस्था करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून आम्ही ही सेवा करत आहोत. यावर्षी आणखी चांगली व्यवस्था आमच्या पक्षाने केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी