28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्र... अन धनंजय मुंडेंनी मागितली भरसभेत जाहीर माफी

… अन धनंजय मुंडेंनी मागितली भरसभेत जाहीर माफी

लय भारी न्यूज नेटवर्क

जामखेड: सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट वाटप करताना राजेंद्र गुंड आणि दत्तात्राय वारे या दोघांना डावलून मीच राम शिंदेंना उमेदवारी बहाल केली होती. दहा वर्षानंतर या भागात येतो तेव्हा माझ्याकडून खरोखरच मोठी चूक झाली होती हे आता जाहिरपणे  मान्यच करावेे लागेल. आज वारे व गुंड दोन्ही नेते आपल्याच व्यासपीठावर आहेत. मागील दहा वर्षांत गुुंड, वारे व या भागातील जनतेनं जे भोगलं, त्याबद्दल मी सर्वांचीच जाहीर माफी मागतो, असे सांगून कर्जत – जामखेड मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत असलेला राम हा आता रावण झाला आहे. त्याचे दहन करायची वेळ आली आहे. येत्या एकवीस तारखेला रावणाचे दहण करून रोहितच्या रूपाने उगवत्या सुर्याच्या पहिल्या किरणाने मतदारसंघ उजळून काढण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

... अन धनंजय मुंडेंनी मागितली भरसभेत जाहीर माफी
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत – जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी जामखेड शहरातील बाजारतळ परिसरात झालेल्या सभेत ते बोलत होते. मुंडे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, फडणवीस यांच्यासह राम शिंदे यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली. ‘ईडी’ची भीती दाखवून भाजपवाले शरद पवारांना संपवायला निघाले आहेत. मात्र आमच्यासारखे लाखो तरुण मावळे राष्ट्रवादीमध्ये आहेत, तोपर्यंत राष्ट्रवादी कोणीच संपू शकणार नाही. पवार साहेब काय आहेत, हे कळण्यासाठी मोदी आणि शहा यांना दहा जन्म घ्यावे लागतील. पवारांनी महाराष्ट्रात जेवढी विमानतळ उभी केली, तेवढे बस स्टँड देखील मोदी शहाने गुजरातमध्ये उभी केलीत का ? अशी तुफान टोलेबाजी मुंडे यांनी केली.’राज्यातील शेतकऱ्यांना विहिरी, शेततलाव दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत. मात्र, त्या विहिरी व शेततलाव शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळालेच नाहीत. फडणवीस सरकारने निर्माण केलेल्या विहिरी व शेततलाव हे गुप्त असून त्या फक्त भाजपवाल्यांनाच दिसत असाव्यात, असा सणसणीत टोला मुंडे यांनी लगावला. कर्जत-जामखेड व परळी मतदारसंघात येताना हेलिकॉप्टरऐवजी गाडीने यावे. म्हणजे इथं नेमका किती विकास झालाय, ते देशाचे नेतृत्व करणार्यांना कळेल,’ असा सल्लाही त्यांनी अमित शहा यांना दिला. अमित शहांचे वय ५४ वर्षे आहे आणि ते पवार साहेबांनी ७० वर्षांत काय केले हे विचारतात,’ असा चिमटाही काढला.

शेतकऱ्यांच्या बाजूने काम करणाऱ्या नेत्यांचा आवाज दाबण्याचा, त्यांना संपवण्याचा प्रयत्न मोदी व शहा करीत आहेत. ४५ हजारात शेततळी उभारण्याच्या सरकारच्या घोषणेचीही मुंडे यांनी खिल्ली उडवली. ‘४५ हजारात यांच्या ‘बा’ ने शेततळे केले होते का,’ असा सवाल राज्यातील 22 मंत्र्यांचे पुराव्यानिशी भ्रष्टाचाराची प्रकरणं मी बाहेर काढली होती. एकाही मंत्र्यावर चौकशी समिती अथवा धडक कारवाई सरकारने केली नाही. उलट सर्वांना क्लिन चीट देत वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. यावर मी मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान देत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर खुल्या व्यासपीठावर समोरासमोर चर्चा करण्याचे अवाहन केले होते. जर मी खोटा ठरलो तर महाराष्ट्रातील कुठल्याही चौकात फाशी द्या अशीही भूमिका घेतली होती. दीड महिना उलटत आला. अजून तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा इतर कुणीही मी दिलेले अव्हान स्विकारलेले नाही असे मुंडे म्हणाले. यावेळी सभेला अलोट गर्दी उसळली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी