29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रधनगर आरक्षणाबाबतचे पत्र घेऊन गिरीष महाजन सकाळी चौंडीला जाणार

धनगर आरक्षणाबाबतचे पत्र घेऊन गिरीष महाजन सकाळी चौंडीला जाणार

धनगर समाजाला अनुसुचीत जमाती (ST) संवर्गात आरक्षण मिळावे यासाठी गेल्या कित्तेक वर्षांपासून धनगर समाज लढा देत आहे. गेल्या 20 दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाज आमरण उपोषणाला बसला आहे. धनगर समाजाला एसटीमध्ये सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाचे पत्र घेऊन जलसंधारण मंत्री गिरीष महाजन मंगळवारी (दि.26) रोजी सकाळी चौंडी येथे जाणार आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. त्यांचे आंदोलन चिघळल्यानंतर सरकारने जरांगे यांना आश्वासन देऊन त्यांचे उपोषण मागे घेण्यात यश मिळविले. त्याच दरम्यान राज्यात ओबीसी, धनगर समाज देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याने सरकारची कोंडी झाली होती. चौंडी येथे यशवंत सेनेच्यामाध्यमातून धनगर समाज बेमुदत उपोषणाला बसला आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षणाचा वटहूकुम काढावा ही प्रमुख मागणी धनगर समाजाने केली होती.

दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दयाकडे गांभीर्याने लक्ष घालत आता हे उपोषण सोडविण्यासाठी फड़णवीस यांचे संकटमोचक मंत्री गिरीष महाजन हबे चौंडी येथे मंगळवारी सकाळी विमानाने बारामती येथे आणि तेथून चौंडीला जाणार आहेत. ओबीसी, भटके विमुक्त खात्याचे मंत्री अतुल सावे, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाचे पत्र घेऊन महाजन धनगर समाजातील उपोषणकर्त्यांची भेट घेणार असून त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी विनंती करणार आहेत.

गेल्या कित्तेक वर्षांपासून धनगर समाज एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी लढा देत आहे. मात्र सरकारला अद्याप त्यामध्ये यश आलेले नाही. त्यामुळे आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे. एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या निर्धाराने धनगर समाज राज्यात ठिकठिकाणी उपोषण करत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेले चौंडी हे धनगर समाजासाठी महत्त्वाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र आहे. अनेक आंदोलनांची सुरुवात धनगर समाजाने चौंडी येथून केली आहे. आता देखील यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाज चौंडी येथे उपोषणाला बसला आहे.

हे सुद्धा वाचा 
सचिन तेंडुलकरांसाठी बच्चू कडूंची भीकपेटी
कोण पात्र, कोण अपात्र, सुनावणी १३ ऑक्टोबरला
जातवार जनगणना भारताचा एक्सरे; राहुल गांधी म्हणाले, मोदी डेटा दाखविण्यास घाबरतात

दरम्यान धनगर समाजासोबत शिष्ठाई करण्यासाठी गिरीष महाजन यांना राज्य सरकारने पाठविण्याचा निर्णय घेतला असून गिरीष महाजन ही शिष्ठाई निष्फळ जाऊ देणार नाहीत याची खात्री असल्याचे बोलले जात आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले असून त्या संदर्भातील पत्र घेऊन ते उद्या सकाळी चौंडीकडे प्रयाण करणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी