28 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरमहाराष्ट्रभिवंडी-कल्याणदरम्यानच्या मेट्रो ५ चे स्वप्न दृष्टीक्षेपात; एमएमआरडीएने अखेर कारशेडची जागा अंतिम...

भिवंडी-कल्याणदरम्यानच्या मेट्रो ५ चे स्वप्न दृष्टीक्षेपात; एमएमआरडीएने अखेर कारशेडची जागा अंतिम केली

एमएमआरडीएने अखेर कारशेडची जागा अंतिम केली असून कशेळी येथे कारशेड उभारण्यात येणार आहे. ही कारशेड २७.१३ हेक्टर भूखंडावर उभारण्यात येणार असून हा भूखंड लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून एमएमआरडीएला वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे भिवंडी- कल्याणदरम्यानच्या मेट्रो ५ चे स्वप्न दृष्टीक्षेपात आले आहे.

‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ चे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील काम सध्या सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील काम अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान, इतर मेट्रो मार्गिकांप्रमाणे ‘मेट्रो ५’ च्या कारशेडचा प्रश्न रखडला आहे. या मार्गिकेचे काम सुरू असले तरी कारशेड अंधातरी होती. मात्र एमएमआरडीएने अखेर कारशेडची जागा अंतिम केली असून कशेळी येथे कारशेड उभारण्यात येणार आहे. ही कारशेड २७.१३ हेक्टर भूखंडावर उभारण्यात येणार असून हा भूखंड लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून एमएमआरडीएला वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
हे सुद्धा वाचा
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजळेंचे मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी केले होते कौतुक
जिनिलिया देशमुखचे मन मुलांसाठी होतयं कासावीस
विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत पुस्तक उपलब्ध नाही; विद्यापीठांची होणार धावपळ

कशेळीतील जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. असे असताना आता कारशेडच्या कामासाठी वन विभागाची पर्यावरणविषयक परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी घेण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला असून सल्लागार नियुक्तीसाठी नुकतीच निविदा मागविण्यात आली आहे. वन परवानगी शिल्लक असल्याने कारशेडच्या कामास सुरुवात होण्यास विलंब होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एमएमआरडीएने मात्र यामुळे कारशेडच्या कामात कोणताही अडथळा येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कारशेडमधील काही भागासाठी ही परवानगी आवश्यक आहे. एकीकडे काम सुरू होईल आणि त्यादरम्यान ही परवानगी घेतली जाईल, असेही एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भिवंडी-कल्याणदरम्यानच्या मेट्रो ५ चे काम सुरू होऊन ते येत्या काही वर्षात पूर्ण झाल्यास ठाणे – भिवंडी मार्गे कल्याणला येणे अधिक सुखकर होणार आहे. सध्या ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे तसेच रस्ते मार्ग आहे. लोकलमध्ये सकाळ आणि सायंकाळी जास्त गर्दी असल्याने अनेकजण रास्ते मार्गाने ठाणे गाठतात. पण हल्ली ठाण्याला जाताना मोठी वाहतूक नजरेस येते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी