33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeएज्युकेशनराष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजळेंचे मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी केले होते...

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजळेंचे मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी केले होते कौतुक

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मृणाल गांजळे-शिंदे यांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. भारतातून 50 शिक्षकांची तर महाराष्ट्रातून एकमेव शिक्षिकेची शालेय विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली होती. मृनाल गांजळे यांना यापूर्वी २०१९ सालचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार व २०२२ सालचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

शैक्षणिक मोबाईल अॅप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृष्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, यु-ट्युब, आकाशवाणी, सॉफ्टवेयर, हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

मृणाल गांजाळे- शिंदे यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर जगभरातील विद्यार्थ्यांना व्हर्चुअल प्रकारे शिक्षणाचे आदान-प्रदान, गेमी फिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, AR-VR चा वापर, असे वेगवेगळे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. ऑनलाइन शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद, वेबसाइट मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अत्याधुनिक शिक्षण दिले.

हे सुद्धा वाचा 
महाराष्ट्रातील पाच शिक्षकांचा देशपातळीवर गौरव; शिक्षकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार
तरुणांनो उद्योजक व्हायचे आहे, ‘ही’ योजना आहे खास तुमच्यासाठी !
खेळाडूंच्या जर्सीवर आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’? सेहवागची बीसीसीआयकडे विनंती

मृनाल गांजळे यांनी सन २०१९-२०२० या वर्षात इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्तीधारक १७ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थी नवोदय २ विद्यालयासाठी निवड पात्र ठरले. पंतप्रधान विद्या वाहिनीवर शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर सेशन मध्ये CIET-NCERT मार्फत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. मागील वर्षी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी देखील दिल्ली येथे त्यांच्या शैक्षणिक कामाचे कौतुक करून सन्मान केला. राष्ट्रीय आयसीटी मेला मध्ये देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी