28 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रकराडलाही आता नाईट लॅण्डींग यशस्वी

कराडलाही आता नाईट लॅण्डींग यशस्वी

सातारा जिल्ह्यात कऱ्हाड  येथील विमानतळावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने वैमानिकांचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. येथे आज नाईट लॅण्डींग यशस्वी झाले आहे. या विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर येथे राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल, अशी माहिती अँबिशिएन्स एव्हीएशन फ्लाईंग क्लबच्यावतीने संचालक परवेझ दमानिया यांनी दिली. प्रशिक्षित व्यावसायिक पायलट बनण्यासाठी 200 तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

कऱ्हाड येथील विमानतळावर Karad Airport विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही फ्लाईंग क्लबच्यावतीने Flying Club सुरु करण्यात आली आहे. त्याची माहिती आज श्री. दमानिया यांनी दिली. विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई, प्रशिक्षण केंद्राचे बेस इन्चार्ज पंकज पाटील उपस्थित होते. दमानिया म्हणाले, येथील विमानतळ जास्त एअर ट्राफीक नसलेले विमानतळ आहे. त्यामुळे याचा वापर वैमानिक प्रशिक्षण सेंटरसाठी सुरु करता येईल असा मानस होता. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार येथे प्रशिक्षण केंद्र सुरु झाले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीशी तीन वर्षाचा करार केला आहे.
हे सुद्धा वाचा
वर्ल्डकप साठी भारतीय संघ जाहीर; या बड्या खेळाडूला मिळाला टीममधून डच्चू
तरुणांनो उद्योजक व्हायचे आहे, ‘ही’ योजना आहे खास तुमच्यासाठी !
एक फुल, दोन हाफने लाठीचार्जचे खापर पोलिसांवर फोडले

प्रशिक्षणासाठीची पाच विमाने या ठिकाणी आणण्यात आली आहेत. अजुनही मोठ्या क्षमतेची विमाने आणण्यात येतील. यातील दोन विमाने दोन सीटची तर एक विमान चार सीटचे आहे. यासाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगर केला असून नाईट लॅण्डींगही करण्यात आले आहे. या विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर येथे राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल.

स्थानिकांसह देशभरातील सुमारे २५ विद्यार्थ्यांना सध्या येथे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांचा कालावधी दोन वर्षांचा आहे. प्रशिक्षित व्यावसायिक पायलट बनण्यासाठी 200 तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आता प्रत्यक्षपणे प्रशिक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी