29 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023
घरमनोरंजनजिनिलिया देशमुखचे मन मुलांसाठी होतयं कासावीस

जिनिलिया देशमुखचे मन मुलांसाठी होतयं कासावीस

अभिनेत्री जिनिलिया देशमुख दहा वर्षांच्या ब्रेकनंतर आता कामाला रुजू झालीये. घरसंसार आणि मुलाबाळांच्या सांभाळासाठी तिने ब्रेक घेतला होता. आता जिनिलिया पूर्वीप्रमाणे शूटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. मात्र मुलांपासून दूर राहिल्याने तिला ‘मॉम गिल्ट’ सतावू लागले आहे. यावर उपायही जिनिलियानं शोधला आहे.

जिनिलिया आणि रितेश देशमुखला रियान आणि राहील अशी दोन मुले आहेत. रियान नऊ वर्षांचा तर राहील सात वर्षांचा आहे. सध्या दोघांची शाळा आणि शूटिंग यात जिनिलियाची कसरत होऊ लागली आहे. बरेचदा सकाळी तिघांची व्यवस्थित भेटही होत नाही. मुलांसोबतच्या रोजच्या संवादात आपणच कुठेतरी कमी पडतोय, ही भावना जिनीलियाला स्वस्थ बसू देईना. मुलांचा डबा तयार करताना तिनं दोघांसाठीही एक खास पत्र लिहिलं. “बाळांनो,मला तुमची खूप आठवण येते, आयुष्यात चांगलं माणूस म्हणून जगणं तुम्हाला सामर्थ्य देतं, आई तुमच्यावर खूप प्रेम करते.” असा प्रेमळ संदेशही जिनिलियानं स्वतः लिहिलेल्या पत्रात दिला.

जिनिलियानं गेल्या वर्षी नवरा रितेश देशमुखसह मराठी सिनेमात पदार्पण केलं. ‘वेड’या मराठी चित्रपटातून रितेश देशमुखनं पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. ‘वेड’ चित्रपटानं तब्बल 75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. जिनिलियानं नुकतंच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केलं. जिओ सिनेमावर प्रदर्शित झालेल्या ‘ट्रायल पिरेड’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आपल्या मुलासाठी ट्रायल पिरेडवर वडील शोधणाऱ्या आईची भूमिका साकारताना जिनिलिया सर्वांच्याच पसंतीस उतरली. जिनिलियानं गेल्या काही महिन्यात दक्षिणात्य चित्रपटातही कमबॅक केलंय. तिने दोन दक्षिणात्य चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय. कामाचं शेड्युल बिझी होत असल्यानं जिनिलिया आपल्या दोन्ही मुलांच्या आठवणीनं व्याकुळ झालीये. कामही करायचंय अन् सततचं गिल्ट ट्रीप सतावत असल्यास मी मुलांच्या डब्यात पत्र लिहिते. तुम्ही कसा उपाय शोधता, असा प्रश्न जिनिलियाननं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये विचारला.

हे सुद्धा वाचा 
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजळेंचे मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी केले होते कौतुक
तरुणांनो उद्योजक व्हायचे आहे, ‘ही’ योजना आहे खास तुमच्यासाठी !
खेळाडूंच्या जर्सीवर आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’? सेहवागची बीसीसीआयकडे विनंती

जिनिलिया कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात खूप खुश आहे. दोन्ही आघाड्या सांभाळताना नवरा रितेश देशमुखची तिला खंबीर साथ आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी सुखरूपपणे पार पाडता येतात, असं तिने अनेक मुलाखतीत सांगितलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी