29 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeमहाराष्ट्रदुर्गाताई तांबे लिखीत '' पारंपारिक ओव्या '' पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन

दुर्गाताई तांबे लिखीत ” पारंपारिक ओव्या ” पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन

टीम लय भारी

संगमनेर : दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख व महिला नेत्या सौ.दुर्गाताई तांबे यांनी संकलित केलेल्या जुन्या काळातील पारंपारिक ओव्यांच्या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व चित्रपट गितकार बाबासाहेब सौदागर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. (Durgatai Tambe written a book published)

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर हे पुस्तक प्रकाशन झाले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,सौ.दुर्गाताई तांबे,कवी बाबासाहेब सौदागर, बाजीराव पा.खेमनर, अ‍ॅड.माधवराव कानवडे,रणजितसिंह देशमुख,इंद्रजितभाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, गणपतराव सांगळे,शंकर पा.खेमनर,उपाध्यक्ष संतोष हासे,सौ.सुनंदाताई जोर्वेकर,सौ.मिराताई शेटे,सौ.अर्चनाताई बालोडे,सौ.निर्मलाताई गुंजाळ,सौ.मंदाताई वाघ, सौ.दिपाली वर्पे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पाकिस्तान भारतीयांच्या जीवाशी टी २० खेळत आहे; ओवेसींचा मोदींवर निशाणा !

सनदी अधिकारी मिलिंद आणि मनिषा म्हैसकर यांच्यावर मधमाशांचा हल्ला
पहिली आवृत्ती  २००९ साली दुर्गाताई तांबे यांनी निघाली.ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. या पारंपारीक ओव्या पुस्तकात लेकीचा जन्म, खेळ गाणी, लग्नाची चिंता, मागणी, वरमाई, बहीणभाऊ, मायलेकी नाते, डोहाळे, बाळाचा जन्म, शेती, सण समारंभ, माहेरची ओढ,उखाणे या सारख्या असंख्य प्रकारच्या घटनांवर ओव्या ओळीबध्द केल्या आहे। कवी बाबासाहेब सौदागर यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

ना.थोरात म्हणाले कि, महाराष्ट्राची समृध्द पंरपरा असून जुन्या ओव्या,गाणी ह्या प्रत्येकाला आनंद देणाऱ्या आहेत. परंतू हा दुर्मिळ ठेवा पुढच्या पिढीकडे जाण्याकरिता प्रत्येकाने या आठवणी संकलित कराव्या. सौ.दुर्गाताई तांबे यांनी व्यस्त दिनचर्यतेतून साहित्याचा छंद जोपासत या पुस्तकांची निर्मिती केली आहे. हे पुस्तक नक्कीच प्रत्येकाच्या संग्रहित ठेवण्यासारखे आहे.

यावेळी कवी बाबासाहेब सौदागर म्हणाले कि, यशवंतराव चव्हाण यांचा समृध्द वारसा सांभाळणारे नामदार बाळासाहेब थोरात हे प्रतिभावंत नेते आहे. समाजकार्याचे बाळकडू मिळालेले नामदार थोरात  व सौ.दुर्गाताई तांबे यांनी कायम संत व कलावंतांचा सन्मान केला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर तालुका हा सृजनशील व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत वैभवशाली ठरला आहे. व्यस्त वेळेतून दुर्गाताई तांबे यांनी संकलित केलेल्या ओव्यांमुळे जुना अनमोल ठेवा पुढच्या पिढीसाठी जपला जात आहे. यावेळी त्यांनी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या जिवनकार्यावर लिहलेली कविता सादर केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.दुर्गाताई तांबे यांनी केले.तर नामदेव कहांडळ यांनी आभार मानले.

शरद पवार यांना आमदार सदाभाऊ खोत यांचे पत्र, हर्बल तंबाखूची लागवडीसाठी मागितली परवानगी

Navratri 2021: क्या होता है कलश-स्थापन? जानिए इसकी तिथि, शुभ मुहूर्त और अनुष्ठान विधि

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी