31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनयूट्युबर एल्विश यादवला पोलिसांकडून अटक; काय आहे प्रकरण?

यूट्युबर एल्विश यादवला पोलिसांकडून अटक; काय आहे प्रकरण?

युट्यूबर एल्विश यादवला (Elvish Yadav) नोएडा पोलिसांनी अटक केली. (Elvish Yadav arrested by Noida Police in snake venom case)सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणात एल्विशला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी एल्विश यादवची चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली होती. गेल्या वर्षी नोएडा पोलिसांनी सेक्टर-49 मध्ये एफआयआर नोंदवला होता. काही वेळाने एल्विश यादवला(Elvish Yadav) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

युट्यूबर एल्विश यादवला (Elvish Yadav) नोएडा पोलिसांनी अटक केली. (Elvish Yadav arrested by Noida Police in snake venom case)सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणात एल्विशला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी एल्विश यादवची चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली होती. गेल्या वर्षी नोएडा पोलिसांनी सेक्टर-49 मध्ये एफआयआर नोंदवला होता. काही वेळाने एल्विश यादवला(Elvish Yadav) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी नोएडा पोलिसांचे पथक सूरजपूरला पोहोचले आहे. आता कोतवाली सेक्टर-20 पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नोएडा झोनचे एडीसीपी मनीष कुमार मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली.

नेमकं काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी एनजीओ पीएफए (मेनका गांधींची संस्था पीपल फॉर ॲनिमल्स) चे प्राणी कल्याण अधिकारी गौरव गुप्ता यांनी एल्विश यादवविरोधात (Elvish Yadav) नोएडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. एफआयआरमध्ये असे लिहिले आहे की एल्विशला दिल्ली एनसीआरमधील फार्म हाऊसमध्ये जिवंत सापांसह व्हिडिओ शूट केले गेले.

सिद्धू मुसेवालाच्या आईनं दिला मुलाला जन्म; पाहा बाळाचा पहिला फोटो

हे साप आणि त्यांच्या विषाचा वापर रेव्ह पार्ट्यांमध्ये बेकायदेशीरपणे केला जातो. रेव्ह पार्ट्यांमध्ये परदेशी तरुणींचा सहभागही उघडकीस आला.या पार्ट्यांमध्ये सापाचे विष आणि इतर अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी राहुल यादवची एक ऑडिओ क्लिप समोर आली होती ज्यामध्ये त्याने पीएफए सदस्याला सांगितले होते की त्याने एल्विशच्या पार्टीला ड्रग्स पोहोचवले होते. पोलिसांना राहुलकडून २० मिली विष आढळून आले.

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश; लढवू शकतात लोकसभा निवडणूक

वनविभागाने सापांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते. 5 नागांच्या विषाच्या ग्रंथी काढण्यात आल्याचे समोर आले आहे. उर्वरित 4 साप विषारी नव्हते. चाचणीनंतर या सापांना जंगलात सोडण्यात आले.

मात्र, एल्विशने या संपूर्ण प्रकरणात स्वत:ला निर्दोष घोषित केले आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. माझ्याबद्दल जे काही बोलले जात आहे त्यात तथ्य नाही. आरोप करून माझे नाव खराब करू नका.

मी यूपी पोलिस आणि माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करू इच्छितो की या प्रकरणात माझ्यावरील आरोपांपैकी 1% देखील सिद्ध झाले तर मी जबाबदारी घेण्यास तयार आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की कृपया कोणत्याही पुराव्याशिवाय माझे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. माझा त्याच्याशी अजिबात संबंध नाही. असं एल्विशने म्हटलं होतं.

कोण आहे एल्विश यादव?

एल्विश यादव हा एक फेमस यूट्यूबर आहे. शॉर्ट चित्रपटांची देखील एल्विश यादव हा निर्मिती करतो. एल्विश याचे एक चॅनल देखील आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून तो आपल्या लाईफबद्दल चाहत्यांना अपडेट देताना दिसतो. गुरुग्राम जवळच्या वजीराबाद येथील रहिवाशी एल्विश यादव हा असून तो 26 वर्षांचा आहे. दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये एल्विश यादव याने बीकॉम केले.

तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेना स्थापना केलेली नाही; दानवेंचे

एल्विश यादव याच्या घराची किंमत आज कोट्यवधीच्या आसपास आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तगडी कमाई एल्विश यादव हा करतो. सोशल मीडियावर त्याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता देखील आहे. बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात धमाकेदार गेम खेळताना एल्विश यादव हा दिसला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी