32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रतुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेना स्थापना केलेली नाही; दानवेंचे बावनकुळेंना उत्तर

तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेना स्थापना केलेली नाही; दानवेंचे बावनकुळेंना उत्तर

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे एक ट्विट रिट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे. ज्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी बावनकुळेंच्या प्रश्नांना खोचक उत्तर दिली आहेत. गेल्या ६३ दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. दादरमधील शिवाजी पार्कवर मोठी सभा होणार आहे. या सभेला दिग्गज नेत्यांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे एक ट्विट रिट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे. ज्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी बावनकुळेंच्या प्रश्नांना खोचक उत्तर दिली आहेत.

गेल्या ६३ दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. दादरमधील शिवाजी पार्कवर मोठी सभा होणार आहे. या सभेला दिग्गज नेत्यांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहे.

हाच मुद्दा पकडत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का?, असा सवाल उपस्थित केला. त्याच्या या प्रश्नाला अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अनेक गोष्टींची आठवण करुन देत उलट उत्तर दिले आहे.

‘काँग्रेसमुळे देश अखंड राहिला…’, संजय राऊतांनी केलं काँग्रेसचं तोंडभरून कौतुक

तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेना स्थापना केलेली नाही…

२०१४ साली विजयाच्या धुंदीत एका फोनवर तुम्ही युती तोडली, तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख देहाने भूतलावर नव्हते. हे तुम्ही भाग्य समजा.

याउपर जाऊन राष्ट्रवादीचा आवाजी मतदानाने पाठिंबा घेऊन आपण २०१४ साली सरकार स्थापन केले होते, हे लोकांना लक्षात आहे. तेव्हा मोठे साहेब असते तर ज्या भाषेत तुमच्यावर प्रहार झाला असता, तो तुम्हाला सहन झाला नसता. उगाच त्यांचे दाखले कशाला देता.

‘मी पुन्हा आलो पण दोन पक्षांना फोडून’, फडणवीस जरा स्पष्टच बोलले

त्यांनी हयातभर भाजपच्या दावणीला पक्ष बांधण्यासाठी, तुमच्या पालख्या वाहण्यासाठी, तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती. ही देखील त्यांचीच शिकवण आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खोटा पुळका आहे तुम्हाला, जर हे प्रेम खरे असते तर एव्हाना तुम्ही त्यांना भारतरत्न देऊन मोकळे झाले असता..

बावनकुळे काय म्हणाले होते?

शिवतीर्थ हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवतीर्थाशी भावनिक नाते आहे. या शिवतीर्थातून स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या दमदार भाषणाने देशभक्ती, हिंदुत्व आणि देशभक्तीचा पहिला जयघोष झाला.

चंद्रशेखर बावनकुळेंनी डिवचले, राहूल गांधींच्या सभेपूर्वी बाळासाहेबांची काढली आठवण !

याच शिवतीर्थावरून हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचेही स्मारक आहे, ज्यांनी म्हटले होते की, ‘मी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही, पण माझे दुकान बंद करू.’ राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीनिमित्त अभिवादन करत नाहीत.

ते का करत नाही, असा सवाल राहुल गांधींना विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंकडे असेल का? आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीला राहुल गांधी श्रद्धांजली वाहतील का? असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात आहे, , असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

लोकसभा लढवण्यासाठी संजय राठोडांवर दबाव; CM शिंदेंची घेतली भेट

आज या शिवतीर्थावर राहुल गांधी ‘न्याय यात्रा’ या नाटक कंपनीसोबत येणार आहेत. आता या शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का? हा प्रश्न आहे, असं सांगत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले.
तसेच, उद्धव ठाकरे वैयक्तिक स्वार्थासाठी विसरले असतील, तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेसबद्दल काय म्हणाले होते ते ऐका!, असही बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी