मुंबई -आग्रा महामार्गावर कोकणगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. सहा वर्षीय नर जातीच्या बिबट्याचा मुंबई आग्रा महामार्गावरील कोकणगाव शिवारातील पेरू बागेजवळ रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.वन विभागाने दिलेल्या अधिक माहितीनुसार, कोकणगाव शिवारातील पेरूच्या बागेजवळ सात वर्षीय नर जातीचा बिबट्या रस्ता ओलांडत असताना नाशिकहून चांदवडच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच वन्यजीव रक्षक राजेंद्र पवार यांनी तत्काळ प्रकाश पावले यांच्या रुग्णवाहिकेस पाचारण करीत महामार्ग वाहतुकीस मोकळा करून दिला.
मृत बिबट्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत पंचनामा केला आहे. चांदवड वन विभागाच्या हद्दीत सदर मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून वनविभाग कार्यक्षेत्रात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी चांदवड वनपरिक्षेत्र प्रादेशिक अधिकारी संजय वाघमारे, चांदवडचे वनपाल प्रकाश सोमवंशी, वडनेर भैरवचे वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक वसंत देवरे, अशोक शिंदे, भरत वाघ आदींसह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.