33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमनोरंजननववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन !

नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन !

नववर्ष स्वागत यात्रा समितीआणि नाशिक महानगर पालिका आयोजित शके १९४६ (२०२४) रोजी गुढीपाडवा निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये महारांगोळी, महावादन, अंतर्नाद, शस्त्र विद्या प्रदर्शन ठेवण्यात आले असून गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातून भव्य अशी स्वागत यात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे स्वागत आपण दरवर्षी भारतीय परंपरे प्रमाणे करीत असतो. २०१६ सालापासून दरवर्षी गोदातीरी गुढीपाडव्याच्या एक आठवड्या पासुनच संस्कृती जपणारे विविध सामूहिक कार्यक्रम घेण्यात येतात. कार्यक्रमाचे उद्देश्य हे आपल्या भारतीय संस्कृतीचे संवर्धन, जतन आणि दर्शन हा असतो.

नववर्ष स्वागत यात्रा समितीआणि नाशिक महानगर पालिका आयोजित शके १९४६ (२०२४) रोजी गुढीपाडवा निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये महारांगोळी, महावादन, अंतर्नाद, शस्त्र विद्या प्रदर्शन ठेवण्यात आले असून गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातून भव्य अशी स्वागत यात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.New Year Swagat Yatra Committee organises various events गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे स्वागत आपण दरवर्षी भारतीय परंपरे प्रमाणे करीत असतो. २०१६ सालापासून दरवर्षी गोदातीरी गुढीपाडव्याच्या एक आठवड्या पासुनच संस्कृती जपणारे विविध सामूहिक कार्यक्रम घेण्यात येतात. कार्यक्रमाचे उद्देश्य हे आपल्या भारतीय संस्कृतीचे संवर्धन, जतन आणि दर्शन हा असतो.< Nashik> nashik New nashik news
कार्यक्रमांचे विषय हे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, पर्यावरण रक्षण, शिक्षण सेवा, महिला सबलीकरण, गोसेवा, सामाजिक एकता, जनजाती पुनरुत्थान इत्यादी प्रमाणे असतात. या वर्षी स्वदेशी हा या सर्व कार्यक्रमाचा विषय (थीम) असणार आहे. यंदाचा हा कार्यक्रम राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ८ एप्रिल २०२४ दरम्यान पाडवा पटांगण (जुने भाजी मार्केट), गोदाघाट येथे आयोजित करण्यात आला आहे.

यावर्षी देखील गोदाघाट येथे महारांगोळी, महावादन, अंतर्नाद, शस्त्र विद्या प्रदर्शन ठेवण्यात आले असून गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातून चार ठिकाणाहून स्वागत यात्रा काढून नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे. तर, अंतर्नाद या कार्यक्रमांतर्गत हिंदुस्तानी कथ्थक, भरतनाट्यम, तबला, बासरी, शास्त्रीय गायन, सुगम संगीत ह्यांचा एकत्रित अविष्कार सादर करण्यात येणार आहे. तसेच, गोदाघाट येथे तृणधान्य माध्यमातून स्थानिक अन्न याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या बाजरी, नाचणी, ज्वारी, सावा, कुटकी, काबू, पोन्नी, वरई, कांगनी, राळा, भगर, सामा, कोराळे, कोद्रा या ३ हजार किलो धान्यापासून महा रांगोळी साकारण्यात येणार आहे. तसेच, जिल्ह्यातील ३० पेक्षा अधिक ढोल पथक महा वादन करणार आहे. त्याचप्रमाणे युद्धकलेचे प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी