30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण ; ठाकरे सरकारचा निर्णय!

महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण ; ठाकरे सरकारचा निर्णय!

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (In Maharashtra, it has been decided to provide free vaccination to all persons above 18 years of age). राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. 

पाच कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. येत्या 1 मेपासून महाराष्ट्रासह देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. (Maharashtra Free Corona Vaccination Drive 18 plus Citizens to get free COVID vaccine)

महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी जवळपास 12 कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी राज्य सरकार 6 हजार 500 कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या फक्त 45 वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण केले जात आहे.

भाजपचे नेते घरात रेमडेसिव्हीर, ऑक्सीजन तयार करतात का ? छगन भुजबळ यांचा सवाल

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

पण राज्याच्या अनेक भागात लसींचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरु करताना मुबलक लसी, कर्मचारी वर्ग यांची सोय सरकारला करावी लागणार आहे.

लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत 45 च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे, असे ही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Coronavirus: Maharashtra announces free vaccines for those in 18-44 age group

“साधारणपणे आपण ६ महिन्यांत हा लसीकरणाचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. त्यासाठी १२ कोटी डोस लागतील. त्यानुसार महिन्याला २ कोटी डोस द्यावे लागतील. ही राज्य शासनाची क्षमता आहे. १३ हजार संस्था आरोग्य विभागाच्या आहेत. त्यामुळे राज्यात रोज १३ लाख लसीकरण करता येऊ शकेल. महाराष्ट्र देशात सर्वात कमी लसी वाया जाण्याचे प्रमाण आहे. सध्या राज्यात १ टक्के लसी वाया जाण्याचे प्रमाण असून देशातल्या ६ टक्के या प्रमाणापेक्षा ते कमी आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न

सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.

उत्तम नियोजन करावे

18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे

कोविन अॅपवर नोंदणी करा

या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल अॅपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित आणि सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणतात.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी